spot_img

व्यभिचारी शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा पाठलाग ,विद्यार्थिनीला मारली थापड, गुन्हा दाखल

व्यभिचारी शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा पाठलाग

◆विद्यार्थिनीला मारली थापड, गुन्हा दाखल

◆मिररवृत्त

◆धामणगाव रेल्वे

◆शरद देवगिरकर

विद्यानगरी म्हणून ओळख असणाऱ्या धामणगाव रेल्वे येथील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केल्याने सदर शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. राज मोहन रगडे असे त्या नराधम शिक्षकाचे नाव असून आपल्याच शाळेतील विद्यार्थीनीचा पाठलाग करून तिच्या गालावर थापड मारल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने केल्याने हा प्रकार समोर आला आहे.
शहरातील प्रतिष्ठित असलेल्या शिक्षण संस्थेच्या से.फ.ला विद्यालयामध्ये पीडित विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. याठिकाणी विद्यालयातील शिक्षक राज मोहन रगडे हा शिक्षक असून अनेक दिवसांपासून या नराधम शिक्षकाची वाईट नजर शाळेमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर होती. मात्र ती विद्यार्थिनी प्रतिसाद देत नसल्याने या शिक्षकाने २० फेब्रुवारी रोजी सदर विद्यार्थिनी शिकवणीला जात असताना या नराधम शिक्षकाने तिचा पाठलाग करून तीचा हात पकडला व तू माझ्यासोबत का बोलत नाही,असे म्हणून तिच्या गालावर थापड मारली.
अपमानित आणि लज्जित झालेल्या त्या विद्यार्थिनीने तेथून थेट आपले घर गाठले व घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली.पालकांनी या गंभीर बाबीची दखल घेत तातडीने विद्यार्थिनीसह दत्तापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन त्या नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद नोंदवली. दत्तापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन देशमुख यांनी कलम३५४,३५४ (ड),३२३,५०१ भादवि कलमासह ८/१२ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ आरोपीस शिक्षकास अटक करण्यात आली.घटनेने मात्र शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!