spot_img

राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिरा मध्ये विद्यार्थ्यांनी केला आरोग्य अधिकाराचा जागर.

राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिरा मध्ये विद्यार्थ्यांनी केला आरोग्य अधिकाराचा जागर

◆मिररवृत्त

◆अमरावती

आरोग्य सेवांचा अधिकार म्हणजे, प्रत्येकाला सरकारी आरोग्य सेवेत विनामूल्य, दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची हमी देणारा कायदा लागू करेल. योग्य सेवा न मिळाल्यास, हक्काने त्या मागता येईल. कायद्याला जोडून, ग्रामीण व शहरी सरकारी सरकारी आरोग्य व्यवस्था सक्षम केला जाईल. असे मत सोमेश्वर चांदूरकर यांनी व्यक्त केले.
रामकृष्ण महाविद्यालय दरापुर द्वारा आयोजित श्रम संस्कार शिबिर डोंगरगाव येथे आपले आरोग्य आपले अधिकारी” या विषयावरती बौद्धिक सत्रा चे आयोजन करण्यात आले होते या वेळी अध्यक्ष म्हणून आण्णासाहेब काळे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. सोमेश्वर चांदूरकर व मयुर चौधरी उपस्थित होते. या वेळी स्वयंसेवक यांना आपल्या आरोग्य अधिकाराची जाणीव व्हावी व स्वतः समेवत समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य अधिकाराचा सुदृढ अधिकार प्राप्त व्हावा या करिता आरोग्य अधिकाराचा जागर करण्यात आला.
आरोग्य सेवेच्या बजेटमध्ये दोन ते अडीच पटीने वाढ सरकारी आरोग्य सेवा सक्षम आणि विस्तारित करण्यासाठी, आरोग्य वरील बजेट बऱ्यापैकी वाढण्याची गरज आहे. सरकारने आरोग्य सेवेवर जर पुरेसा निधी खर्च केला, तर लोकांना स्वतःच्या खिशातून किंवा कर्जबाजारी होऊन भरमसाठ बिले भरण्याची वेळच येणार नाही. त्यामुळे सरकारी आरोग्य खर्च वाढवून सकळ राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्के वाढवावा लागेल. आरोग्य सेवेवर महाराष्ट्र सरकारचा वार्षिक दरडोई खर्च सध्या फक्त १८०० रू. आहे तो किमान ४००० रू करण्याची दिशा घेतली पाहिजे असे मत मयुर चौधरी यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेवा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून तो प्रत्येकाला प्राप्त व्हावा या करिता आपण आरोग्य अधिकारची ची जाणीव प्रत्येक नागरिकांना मध्ये निर्माण करून त्याचा जागर करावा असे प्रतिपादन सोमेश्वर चांदूरकर यांनी मार्गदर्शन करताना केले.
आरोग्य हे जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असून त्याचे रक्षण व संरक्षण करणे ही आपली नैतिक जबाबारी असल्याचे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून अण्णासाहेब काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. डॉ यशवंत हरणे कार्यक्रम अधिकारी रासेयो पथक, रामकृष्ण महाविद्यालय दारापुर, प्रा. डॉ. दांडगे, प्रा. डॉ. पांडे, संयोजक प्रा. सूरज विधळे, प्रा. मंगेश भटकर, व बहुसंख्येने रसेयो पथकाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!