spot_img

बिझीलँड मधील आराधना प्रतिष्ठान वर जीएसटी ची धाड

बिझीलँड मधील आराधना प्रतिष्ठान वर जीएसटी ची धाड

■सलग दहा तास सुरू होती कार्यवाही
■50 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

कापड व्यवसायातील नामांकित आराधना प्रतिष्ठानवर सोमवारी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाच्या चमूने धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत जवळपास ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे, फाइली ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सोबतच बिझीलॅण्डमधील प्रतिष्ठान सील करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
रेडिमेड कपडे व कापडाचे प्रतिष्ठान असलेल्या आराधना प्रतिष्ठानवर जीएसटीच्या चमूने सोमवारी सकाळीच धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, सायंकाळी ६ वाजतानंतर प्रतिष्ठानाचे अर्धे शटर खाली झाल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे या परिसरातील अन्य प्रतिष्ठान दिवसभर सुरू होते. मात्र, बाहेरील व्यक्ती अथवा ग्राहकांना आत एण्ट्री नव्हती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जीएसटीच्या चमूने सलग ८ ते १० तास प्रतिष्ठानमध्ये अनेक कागदपत्रे व फाइलींची तपासणी केली.
या दरम्यान आराधना मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा
आतमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत जीएसटी चमूचे सर्चिंग सुरूच होते. आराधनाचे शटर खाली असल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांनीही तेथे गर्दी केली होती. या धाडसत्रामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!