संविधान सभेचे सदस्य ब्रिजलाल बियाणी यांच्या समूह छायाचित्राचे अनावरण
●ब्रिजलाल बियाणी संविधान सभेचे सदस्य असणे ही गौरवाची बाब- ओमप्रकाश लढ्ढा
●मिररवृत्त
●अमरावती
भारतीय संविधान सभेचे वऱ्हाड प्रांतातील दुसरे सदस्य ब्रिजलाल बियाणी यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्य भारतीय संविधान समितीमध्ये त्यांचा समावेश असलेल्या समूह छायाचित्राचे ६ डिसेंबर रोजी श्री.ब्रिजलाल बियाणी शिक्षण संस्थेच्या परिसरात अनावरण करण्यात आले. ब्रिजलाल बियाणी हे संविधान सभेचे सदस्य असणे ही सर्व बियाणी परिवारासाठी गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश लढ्ढायांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभा समितीमध्ये वऱ्हाड प्रांतातील डॉ. पंजाबराव देशमुख तसेच ब्रिजलाल बियाणी या दोन सदस्यांचा समावेश होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी श्री.ब्रिजलाल बियाणी शिक्षण संस्थेत आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी ब्रिजलाल बियाणी यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त त्यांचा समावेश असलेल्या संविधान सभेच्या सदस्यांचे समूह छायाचित्र अनावरण कार्यक्रमाचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच ब्रिजलाल बियाणी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला शिक्षण समितीचे पदाधिकारी देवदत्त शर्मा, सुनीलकुमार गोयंका,ब्रिजलाल बियाणी यांचे नातू राजीवजी बियानी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या समूह छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी या दुर्मिळ छायाचित्र उपलब्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले. धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर व श्री महात्मा फुले महाविद्यालय, वरुड या महाविद्यालयाचे प्राचार्य व तेथील शिक्षक रेड्डी सर व बुरघाटे सर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ यांचे विशेष सहकार्य लाभले.या छायाचित्रांमध्ये एकूण 389 पहिल्या संविधान सभेच्या सदस्यांचा सहभाग आहे. या छायाचित्राच्या माध्यमातून ब्रिजलाल बियाणी यांचा जीवनपट हा नवीन पिढीसमोर येईल तसेच संविधान निर्मितीसाठी आपल्या महामानवांना काय कष्ट घ्यावे लागले याची पण जाणीव या माध्यमातून होऊ शकते. पिढ्यानपिढ्या ही माहिती सातत्याने समोर यावी म्हणून हे छायाचित्र महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे प्रयोजन केले आहे असेही प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज हेरे यांनी केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ.सोनल मुंधडा, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच मनीष महाजन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले।.