spot_img

तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली जिल्हा हादरला

तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली जिल्हा हादरला

●आजी आजोबांसह दहा वर्षीय नातीची गळा चिरून हत्या

●मिररवृत्त
●गडचिरोली

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृध्द आजी – आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपासचक्रे गतिमान केली आहेत. दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुंडापुरी येथील एका कुटुंबात वृध्द आजी-आजोबा राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह मरकल (ता. एटापल्ली) येथील तरुणाशी झालेला आहे. या गावातील मुलीची कन्या दिवाळीसाठी आजोळी गुंडापरीला गेली होती. या घटनेत तिलाहीआपला जीव गमवावा लागला. अर्चना रमशे तलांडे (१०,रा.येरकल ता. एटापल्ली) असे तिचे नाव असून ती चौथीच्या वर्गात शिकत होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!