spot_img

दर्यापूर येथे युवतीवर देशी कट्ट्याने गोळीबार,जिल्ह्यात खळबळ

दर्यापूर येथे युवतीवर देशी कट्ट्याने गोळीबार

●युवतीची प्रकृती गंभीर,दर्यापूर पोलिसांचा नाकर्तेपणा
●बयाण देऊन परत येतांना केला गोळीबार

●मिररवृत्त

●अमरावती :-अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असलेले सोळंके कुटुंब आपल्या २६ वर्षीय मुलीसोबत स्वगृही परतत असताना तीन ते चार युवकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रात्री आठ वाजता उघडकीस आली.या घटनेमध्ये तेजस्वी विश्वजीत राणे यांच्या कानावर गोळी लागली असून देशी कट्ट्याने तीन राउंड फायर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तेजस्वी राणे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामकृष्ण सोळंके,अनिता रामकृष्ण सोळंके, तेजस्वी विश्वजीत राणे व गजानन सुधाकर हूरपडे सर्व राहणार अंजनगाव सुर्जी असे गोळीबार मध्ये जखमी झालेल्यांची नावे आहे.जखमींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोळंके परिवार आपल्या मुलीसह एका प्रकरणात बयान देण्यासाठी अमरावती येथे आले होते.त्यांचे काम आटोपल्यावर सोळंके परिवार सायंकाळी सात वाजता आपली कार क्रमांक एम एच २७ डी एस ८७२१ ने स्वगृही परतत असताना त्यांचा पाठलाग बीएमडब्ल्यू कंपनीच्या एका कार मध्ये असलेले चार युवक करीत असल्याचे सोळंकी यांच्या लक्षात आले.त्यावेळी ते वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत होते.त्यांनी तात्काळ ११२ वर कॉल करून पोलिसांना ही माहिती दिली.सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी कुठलाही वेळ न गमावता तात्काळ सोळंके यांच्या मदतीला हजर झाले.पोलिसांच्या मदतीने सोळंके परिवार यांना खोलापूर पोलीस ठाण्यापर्यंत वलगाव पोलिसांनी सोडून दिले त्यानंतर खोलापूर पोलिसांनी दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत सोळंके परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मध्ये सोडून दिले मात्र या ठिकाणी दर्यापूर पोलीस यांनी पोहोचण्यास विलंब केल्यामुळे बीएमडब्ल्यू कार मध्ये असलेल्या युवकांनी सोळंके परिवारावर गोळीबार केला.या गोळीबार मध्ये तेजस्वी विश्वजीत राणे यांच्या डाव्या कानाला गोळी लागली.
सोळंके परिवारावर हल्ला करताच बीएमडब्ल्यू कार मध्ये असलेले युवकांनी पळ काढला.तेजस्वी राहणे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तसेच सोळंके परिवार व हूरपुडे हे सुद्धा या गोळीबार मध्ये गंभीर रित्या जखमी झाल्याने उपस्थितांनी तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतला तसेच उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सोळंके यांचे बयान नोंदविले.
सोळंके यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विश्वजीत राणे व महेश हडदे यांच्यासह अन्य दोघे बीएमडब्ल्यू कार मध्ये त्यांचा पाठलाग करीत होते. पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्येच ते अमरावती पासून दर्यापूर पर्यंत आले मात्र दर्यापूर पोलिसांनी विलंब केल्यामुळे त्यांच्यावर घात टाकून बसलेल्या विश्वजीत राणे यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.सोळंके यांच्या परिवारावर आरोपींनी सतत तीन राऊंड फायर केले. यातील एक गोळी तेजस्वी राणे यांच्या कानशिलात लागलेली आहे.त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मते सदर गोळीबार देशी कट्ट्यातून झाला असल्याचे त्यांनी प्राथमिक माहितीत सांगितले.पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याकरिता पथक रवाना केले असून तात्काळ संपूर्ण आरोपी जेरबंद असतील असा कयास पोलीस निरीक्षक टाले यांनी दर्शविला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!