शिवशक्ती व गणेश क्रीडा मंडळ यांचे दिवाळी मिलन सोहळा
●मिररवृत्त
●नांदगाव पेठ: दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवशक्ती व गणेश क्रीडा मंडळ यांनी दिवाळी मिलन सोहळा आयोजित केला होता त्यात विशेष बाब म्हणजे मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवून आणल्या होत्या. कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून
संदीप आकोलकर सर , शरद राऊत सर, भाऊरावजी कापडे , अनिलजी कापडे, पत्रकार निलेश सरोदे, गजानन चुळे, संतोष भटकर,कौमुदी काळीकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
कार्यक्रमांमध्ये मुलांनी त्यांच्यातील असलेल्या विविध कला गुणांचे सादरीकरण केले त्यामध्ये गायन ,नृत्य व वकृत्व असे रंगीतदार कार्यक्रमांचा आस्वाद श्रोते वर्गांनी घेतला विशेष बाब म्हणजे शिवशक्ती व गणेश क्रीडा मंडळ यांनी चिमुकल्या वर्गांसाठी जो मंच तयार केला त्यामध्ये मुलांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे स्थान दरवर्षी उपलब्ध करून देतात तसेच क्रीडा क्षेत्रात सुद्धा उत्तम कामगिरी ते करत असतात त्याचा सुद्धा प्रत्यय श्रोते वर्गांना आला त्यांच्या मंडळातील दोन मुली नुकताच इंटरनॅशनल असोसिएशन द्वारे कबड्डीसाठी सिलेक्ट झाल्या त्यांचा सुद्धा तिथे सत्कार करण्यात आला तसेच मुलांनी करून आणलेल्या गडकिल्ल्यांची पाहणी करून व त्यांच्याद्वारे विविध किल्ल्यांची माहिती सुद्धा श्रोते वर्गांना ऐकायला मिळाली त्यानंतर परीक्षकांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हातून बक्षिसांचे वाटप झाले.तसेच शिवशक्ती व गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मंगेश कापडे व गजानन राणे यांनी समस्त मान्यवरांची व नांदगाव पेठ ग्रामवासी यांचे आभार मानून व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.