spot_img

त्या’राख’प्रकरणात पडताळणी समितीचा अहवाल दिशाभूल करणारा

त्या’राख’प्रकरणात पडताळणी समितीचा अहवाल दिशाभूल करणारा

■ समितीने कार्यालयात बसून अहवाल दिल्याची चर्चा
■ स्पॉटपंचनामा केलाच नाही,उंटावरून हाकलल्या शेळ्या

■मिररवृत्त
■मंगेश तायडे/नांदगाव पेठ

रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पातील अतिरिक्त राख आयआरबीच्या पाण्याने भरलेल्या खदाणीत टाकण्याच्या प्रकाराला भाजपच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला शिवाय भाजपच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले मात्र या प्रकरणात पडताळणी समितीने दिलेल्या अहवालात तथ्य नसून हा अहवाल दिशाभूल करणारा असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते महेंद्र चिरडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पडताळणी समितीने सदर अहवाल हा कार्यालयात बसून दिला असल्याची चर्चा आहे तर समितीने स्पॉट पंचनामा केला नसल्याचे देखील समजते.
पिंपळविहीर मधील क्षेत्र ड्रायझोन मध्ये आहे.याठिकाणी पाण्याची मुबलक सोय नाही.आयआरबीने खोदलेल्या खदाणीत शंभर फूट पेक्षा अधिक खोलवर पाणी असून हे पाणी आजूबाजूला असलेल्या शेतीच्या सिंचनासाठी किंवा पिण्यासाठी वापरण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केली होती. पडताळणी समितीने दिलेल्या अहवालात एक किलोमीटर पर्यंत शेती नसल्याचे नमूद केले आहे वास्तविक याठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावर शेती आहे. पाण्याचे स्तोस्त्र जरी आजूबाजूला नसले तरी या नैसर्गिक स्तोस्त्राचा वापर गावकऱ्यांसाठी करता आला असता.
शेकडो टन राख पाण्यात टाकल्याचे पुरावे असतांना देखील पडताळणी समितीला पाण्यात राख न दिसणे म्हणजे हा अहवाल मॅनेज करून उंटावरून शेळ्या हाकलल्याचा प्रकार असल्याचे उपोषणकर्ते चिरडे यांचे म्हणणे आहे.पडताळणी समितीने दिलेल्या अहवालानुसार शास्त्रोक्त पद्धतीने राख भरण्यासंदर्भात ॲशटेकला सूचना दिल्या आहेत मात्र तरीही पाण्यात राख टाकू देणार नसल्याचा भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम आहेत.

■ राखेचा ट्रक आमच्या अंगावरून जाईल ■

पाण्यात राख टाकू नये,त्या पाण्याचा वापर अन्य कामांसाठी करता येईल अशी भूमिका महेंद्र चिरडे यांनी घेतली होती. पडताळणी समितीने ॲशटेकच्या बाजूने निर्णय दिला असुन या निर्णयाला आमचा विरोध आहे.पाण्यात राख टाकण्याच्या आधी राखेचा ट्रक आमच्या अंगावरून जाईल.अशी भूमिका उपोषणकर्ते महेंद्र चिरडे यांनी घेतली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!