spot_img

बांधकाम विभागाच्या पाच इंजिनिअर्स ला कारणे दाखवा नोटीस

बांधकाम स्ट्रक्चर ऑडिट च्या अहवालानुसार
जि.प.बांधकाम विभागाच्या पाच इंजिनिअर्स ला कारणे दाखवा

●प्रहार चे अरुण शेवाणे यांच्या पाठपुरावा व अन्नत्याग उपोषणाला यश

●मिररवृत्त
●चेतन हिंगे/अंजनगाव सुर्जी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम तब्बल 2 कोटी चे असून उद्घाटन २०१३ मध्ये झाले होते. चार-पाच वर्षांपासूनच इमारत खूप जुनी दिसत होती. म्हणजेच इमारतीच्या भिंतींना जागोजागी भेगा पडणे, पावसाळ्यात छत गळणे, भिंतींना लावलेल्या स्टाईल्स खाली पडणे, तर खालच्या स्टाईल्स उखडल्याने नासधुस होणे, तावदाण्या तुटणे, कपाटाची दारं पडणे, इत्यादी कारणामुळे सदर इमारत बांधकाम साहित्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणण्याकरिता प्रहार चे उपतालुका प्रमुख अरुण शेवाणे यांनी २०१८ पासून निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन बांधकाम स्ट्रक्चर ऑडिट अमरावती यांच्याकडे सदर इमारतीच्या दर्जाबाबत शिफारस केली होती. त्यानुसार बांधकाम स्ट्रक्चर ऑडिट यांच्या अहवालानुसार सदर इमारत दहा वर्षामध्ये वापरयोग्य नसल्याचे कळविण्यात आल्याने सदर इमारतीचे बांधकाम ज्या इंजिनियर्सच्या देखरेखीत करण्यात आले त्या इंजिनियर्सला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांच्या संपत्तीतून करण्यात यावी तसेच नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविणे तसेच आरोग्य सेवेकरिता तात्पुरा निवारा उभारणे इत्यादी मागण्या घेऊन दि.३० नोव्हेंबर २०२३ पासून अन्नत्याग उपोषणाला प्रहार संघटना उप तालुकाप्रमुख अरुण शेवाणे बसले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दि.१ डिसेंबर ला दुपारी तीन वाजता उप अभियंता श्री फाले व श्री विवेक राठोड उपकार्यकारी अभियंता दर्यापूर यांच्या हस्ते व शशिकांत मंगळे सरपंच कसबेगव्हान, वैद्यकीय अधिकारी नागपुरकर,कापुसतळणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजय कथळकर, ग्रा.पं. सदस्य किशोर खडसे, प्रदीप सातवटे, शेख जावेद शे.ईसा, माधवराव वानखडे, प्रशांत सरदार, वसंत बनाईत व समस्त नागरिकांच्या उपस्थितीत लेखी पत्र देऊन उपोषण सोडण्यात आले.

◆यांना देण्यात आली कारणे दाखवा नोटीस◆

ताराचंद पी.लुधियाने,शाखा अभियंता
एस. जी. वानखडे, उप अभियंता
श्रीमती निला वंजारी,तत्कालीन उपअभियंता
पि.जी.भागवत,कार्यकारी अभियंता
श्रीमती श्वेता बॅनर्जी,तत्कालीन कार्यकारी अभियंता

यांना १५/१२/२०२३ पर्यंत खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याने जिल्ह्यातील इंजिनियर्स चे धाबे दणाणू लागले असल्याची चर्चा जिल्हाभर चालू आहे. या पाठपुरावा व उपोषणाबद्दल अरुण शेवाणे यांचे गावकऱ्यांनी आभार मानले असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!