विद्यापीठ कुस्ती संघाची दमदार कामगिरी
●सुवर्ण पदकासह 9 खेळाडूंनी गाठली पात्रता फेरी
●मिररवृत्त
●अमरावती
चंदिगढ विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुस्ती पटूनी चमकदार कामगिरी करून या संघातील एकूण 5 मुली आणि 4 मुलांनी अखिल भारतीय स्पर्धेची पात्रता फेरी गाठली आहे. संघातील युवाशक्ती महाविद्यालयाच्या अतुल याने 70 किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकून लौकिक प्राप्त करून पात्रता फेरी गाठली तर प्रदीप पवार, नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबिड, कृष्णा हरणवाल, छञपती शिवाजी महाविद्यालय, आसेगाव पूर्णा, सिद्धार्थ गवई, कला, वाणिज्य महाविद्यालय, येवदा यांनी आपापल्या वजन गटात विजय मिळवून पात्रता फेरीत प्रवेश निश्चित केला.
मुलींमध्ये कोमल गवई, धनश्री पाथरे, खुशबू चौधरी सर्व डी.सी.पी. ई अमरावती, प्रेरणा अरुडकर, सालुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजा आणि अंजली कोतरवार, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला यांनीही दमदार कामगिरी करून पात्रता फेरी गाठली. पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून पोलीस विभागातील अनुभवी खेळाडू अतुल तायडे आणि जितेंद्र डिके यांची तर महिला प्रशिक्षक म्हणून निकिता ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. राजेश चंद्रवंशी, आर.एल. टी. महाविद्यालय अकोला आणि डॉ. ए. एन. देवरे, प्रभारी प्राचार्य, इन्नानी महाविद्यालय, कारंजा लाड यांनी चोख जबाबदारी निभावली. संघाच्या चमकदार कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ प्रमोद येवले, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्राधिकारिणीचे सर्व सदस्य, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन करून अखिल भारतीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्यात.