spot_img

नुकसानग्रस्त पिकांची वंचित बहुजन युवा आघाडीने केली पाहणी

नुकसानग्रस्त पिकांची वंचित बहुजन युवा आघाडीने केली पाहणी

तात्काळ नुकसानभरपाई देण्याची सागर भवते यांची शासनाला विनंती..

मिररवृत्त तिवसा
गेल्या 3 दिवसापासून जिल्हयासह तिवसा तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची विनंती वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकाची पाहणी करताना केली आहे.
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड, भारसवाडी, निंभोरा, सातरगाव, वरुडा, दापोरी सह इतर गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. पाहणी करताना जिल्हा महासचिव सागर भवते यांनी नुकसानग्रस्त पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला. अस्मानी संकटाने तथा शासनाच्या अन्यायी धोरणाने सामान्य गरीब शेतकरी कायम पिचला जात असून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक उध्वस्त झाले आहे तेव्हा प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता तहसीलदार, मंडळ अधिकरी यांनी थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचुन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी यावेळी युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केली आहे. शेतावर भेट देताना यावेळी जिल्हा सदस्य बबलू मुंद्रे, उंबरखेड शाखा अध्यक्ष रोषण ढोणे, भारसवाडी शाखा अध्यक्ष सागर गोपाळे, तेजस गडलिंग, अभिजीत मुंद्रे, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली मुंद्रे उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!