spot_img

धामोरी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या

धामोरी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या

अमरावती – दर्यापूर राज्य मार्गांवरील घटना

मिररवृत्त
वाठोडा शुक्लेश्वर

खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामोरी येथील ६५ वर्षीय इसमाने भिंगरीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली,सुभाष गुलाबराव डोंगरे वय ६५ रा. धामोरी असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे,सुभाषने आत्महत्या कशामुळे केलीहे अद्याप गुलदस्त्यात आहे.

मृतकाच्या नातेवाईकांनी खोलापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीनुसार खोलापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली,घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस स्टे. ठाणेदार ईश्वर वर्गे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला,
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आला सदर घटनेचा तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. कैसर खान, पोलीस कॉ. सतीश डहाके, आशिष जामकर करत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!