spot_img

खा.बोंडे यांच्यावरील दगडफेकीचा धारणी भाजपने केला निषेध

खा.बोंडे यांच्यावरील दगडफेकीचा धारणी भाजपने केला निषेध

आरोपींवर कडक कार्यवाहीची केली मागणी

मिररवृत्त
धारणी

तिवसा येथील शंकरपटाच्या कार्यक्रमात खा.अनिल बोंडे यांच्यावर केलेल्या दगडफेकीचा धारणी भाजपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींवर कडक कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
खा.बोंडे हे रविराज देशमुख यांनी आयोजित केलेल्या शंकरपटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता गेले असता मागून अज्ञातांनी दगडफेक केल्याने खा.बोंडे यांच्या खांद्याला सुद्धा दुखापत झाली आहे. शिवाय बोंडे यांच्या अंगरक्षकाला सुद्धा इजा झाली आहे. या प्रकाराने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
धारणी येथील भाजपचे शहर अध्यक्ष श्याम गंगराळे यांनी या घटनेचा निषेध करत धारणी पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करून आरोपीवर कडक कार्यवाहीची मागणी केली आहे यावेळी निवेदन देतांना लोकेश धनेवार, दीपक मालवीय, मालती कासदेकर,गोविंद खरे, कमलेश भगत, मुकेश नालमवार,अशोक केदार, रिंकू बडनखे, दर्शन बरघे, तुळशीराम बेठेकर, नंदकिशोर मोरे, संदीप राऊत, अशोक केदार, चंद्रशेखर खर्वे, जया खंडारे, सुशांत बेठेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!