spot_img

अज्ञात माथेफिरूने ग्रामपंचायतच्या बॅनरवर शेण फेकले

अज्ञात माथेफिरूने ग्रामपंचायतच्या बॅनरवर शेण फेकले

शिवणगाव येथील प्रकार, उपसरपंचयांची पोलिसांत तक्रार

मिररवृत्त
नांदगाव पेठ

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. यशोमती ठाकूर यांनी शिवणगाव साठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने ग्रामपंचायतच्या वतीने सुर्यगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन बॅनर लावण्यात आले होते मात्र त्या बॅनरवर अज्ञात माथेफिरूने शेण फासल्याने गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.याप्रकरणी उपसरपंच नंदकिशोर पोलगावंडे यांनी नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
२६ नोव्हेंबर रोजी शिवणगाव येथील सुर्यगंगा नदीचे आ.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन होते.ग्रामपंचायतच्या वतीने भूमिपूजन कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले होते.मात्र कार्यक्रमानंतर अज्ञात माथेफिरूने बॅनर ला शेण फासले.तसेच उपसरपंच नंदकिशोर पोलगावंडे यांच्या फोटोवर देखील शाई फासण्यात आली.या प्रकाराने शिवणगाव येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नंदकिशोर पोलगावंडे यांनी नांदगाव पेठ पोलिसांत याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात माथेफिरूवर तातडीने कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन देखील गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे. भूमिपूजन कार्यक्रम थाटात आणि असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत झाल्याने काही विरोधकांच्या पोटात दुखलं त्यामुळेच अज्ञात भामट्याने हा प्रकार केला असल्याची प्रतिक्रिया नंदकिशोर पोलगावंडे यांनी यावेळी दिली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!