spot_img

बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वधर्मीयांना एकत्र आणले – आ. बच्चू कडू

संविधान दिन:आमदार बच्चू कडू यांच्याहस्ते १०० संविधान अंकाचे महिलांना वाटप,
बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वधर्मीयांना एकत्र आणले – आ.कडू

मिररवृत्त/अमरावती

भारतीय संविधान दिनानिमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथे करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते महिलांना संविधानाच्या शंभर प्रत, तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना १०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय समाज प्रबोधनाचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.

कार्यक्रमाला उद्घाटन दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू, अतिथी म्हणून वऱ्हाड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र वैद्य, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसु, महानगर प्रमुख बंटी रामटेके, प्रा.तुषार रामटेके, छोटू दाभाडे, प्रा.राहूल फाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. सर्वधर्मीयांना एकत्रित आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले आहे. असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.

तसेच महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी सांगितले की, संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.

तत्पूर्वी, गत १८ ऑक्टोंबर पासून निशुल्क पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणारे राहुल फाटे, प्रा. तुषार रामटेके स्वाती दाभाडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यासोबत कुस्ती मध्ये राज्यातून ८० वजन गटात द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या मल्हार राजेश वानखडे यांचाही अतिथींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार रावसाहेब गोंडाने यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख गोलू पाटील शेख, अकबर शेख, शाम इंगळे, अभिजीत गोंडाने, ऋषिकेश मोहोळ, शेषराव धुळे, विक्रम जाधव, योगेश कावरे, उमेश मेश्राम, संदीप चव्हाण, अजय तायडे, बंडू वानखडे, सुधीर मानके, मनीष पवार, विशाल ठाकूर, विकी खत्री, कुणाल खंडारे, राम खरुले यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्ष महानगरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सप्त खंजिरी वादक क्रांती काळे यांचे समाज प्रबोधन

भारतीय संविधान दिनानिमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे सत्यपाल महाराज यांचे शिष्य राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक कुमारी क्रांती काळे यांचा समाज प्रबोधनाच्या कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ६ वाजता झालेल्या प्रबोधनात संविधानावर प्रकाश टाकला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!