spot_img

संजय बनारसे, मंगेश तायडे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार

संजय बनारसे, मंगेश तायडे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार

३ डिसेंबर ला दिल्ली येथे होणार पुरस्कार वितरण

डॉ.आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे आयोजन

अमरावती/प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे पत्रकारितेमध्ये काम करणारे संजय बनारसे आणि मंगेश तायडे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथील संविधान भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.डॉ.आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असून दिग्गज मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.
संजय बनारसे हे शहरातील नामांकित वृत्तपत्रामध्ये उप संपादक म्हणून कार्यरत आहेत तर मंगेश तायडे यांनी नांदगाव पेठ सारख्या गावातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात करून आजवर अनेक सामाजिक समस्यांना लेखणीच्या जोरावर सोडविण्यात यश मिळविले. संजय बनारसे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय,विभागस्तरीय तंटामुक्ती पुरस्कार तसेच जलयुक्त शिवार योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे तर मंगेश तायडे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय तंटामुक्ती पुरस्कार, गोवा सरकारचा गुणवंत युवा पत्रकार पुरस्कार तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संजय बनारसे आणि मंगेश तायडे यांच्या लेखणीची दखल घेत डॉ.आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने यावर्षीचा पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता दिल्ली येथील संविधान भवन येथे सामाजिक न्याय मंत्री मंत्री रामदास आठवले, केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, आदीला फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. एस.आदी नारायणा,डॉ. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव मेमन,डॉ. मनीष गवई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारिता, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने संजय बनारसे, मंगेश तायडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!