spot_img

पवित्र संविधानाचे संरक्षण आणि जागृती होणे आवश्यक

पवित्र संविधानाचे संरक्षण आणि जागृती होणे आवश्यक
आमदार ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती/प्रतिनिधी/ 26 नोव्हेंबर 2023:- पवित्र संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानामुळेच अनेकांना न्याय मिळाला आहे. परंतु सध्या दुदैवाने पवित्र संविधानाची तोडफोड करण्याचे प्रकार सध्या होताहेत. हे चूकीचं असून पवित्र संविधानाचे संरक्षण आणि जागृती होणे अतिशय गरजेचे आहे असे मत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान जागृती रॅली काढण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढं बोलतांना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख हे खरे समाजसुधारक होते. त्यांनी कोणती अपेक्षा न ठेवता आपल सर्वस्व देशासाठी अर्पण केलं. डॉ. पंजाबराव देशमुख यांची कर्मभूमी ही अमरावतीच आहे. त्यांच शैक्षणिक क्षेत्रातल कार्य उत्तुंग आहे. त्यामुळे या समाजसुधारकांनी समाजाला ही दिशा दिली आहे, त्याची कास धरावी लागेल, असही त्या यावेळी बोलतांना म्हणाल्या. काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात संविधान जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलींद चिमोटे, किशोर बोरकर, भैय्या पवार, काँग्रेसच्या अनुसूचित जमातीची जिल्हाध्यक्ष प्रविण मनोहर, अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे, जिल्हा ग्राहक मंचचे सदस्य समिर जवंजाळ, शैलेश काळबांडे, डॉ. अंजली ठाकरे, डॉ. वर्षा देशमुख, एनएसीयुआयचे अध्यक्ष वैभव देशमुख यांच्यासह शहर काँग्रेसचे व जिल्हा काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!