spot_img

हुंडाबळी आरोपातून गणेश धवणे याची निर्दोष मुक्तता

हुंडाबळी आरोपातून गणेश धवणे याची निर्दोष मुक्तता

ऍड.भेलांडे यांचा युक्तिवाद

अमरावती/प्रतिनिधी

लग्नात सोन्याचा गोफ, अंगठी आणि ब्रेसलेट दिले नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्यामुळे आरोपी गणेश धवणे यांच्यावर कौटुंबिक छळ व हुंडाबळी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र बचाव पक्षातर्फे ऍड. प्रशांत भेलांडे यांनी युक्तिवाद करून न्यायालयाने आरोपी गणेश धवणे याची निर्दोष मुक्तता केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 2 जून 2013 रोजी धामणगाव रेल्वे येथील गणेश धवणे याचे पुलगाव येथील एका युवतीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर एक वर्षाच्या आत दि.5 फेब्रुवारी 2014 रोजी विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केली मात्र मृतकाच्या भाऊ गणेश धोंडे याने याबाबत दत्तापुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली की,आरोपी गणेश धवणे याने लग्नात आपल्याला सोन्याचा गोफ, अंगठी आणि ब्रेसलेट दिले नाही म्हणून माझ्या बहिणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला व बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केले.गणेश धोंडे यांच्या तक्रारीवरून दत्तापुर पोलिसांनी आरोपी गणेश धवणे याच्यावर भादंवि 304 (ब), 498 (अ),306 अन्वये गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली होती.
सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय येथे असतांना सरकारी वकिलांनी मृतकाचा भाऊ व अन्य नातेवाईकांचे बयाण घेऊन आरोपीला कठोर शिक्षा करावी असा युक्तिवाद केला तर बचाव पक्षातर्फे ऍड. प्रशांत भेलांडे यांनी युक्तिवाद केला की ज्या दिवशी विवाहितेने आत्महत्या केली त्या दिवशी ती घरात एकटीच होती तसेच लग्नापूर्वीपासून तिच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी धवणे कुटुंबाला महिती देणे गरजेचे असतांना हेतुपुरस्सर याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आणि नैराश्यतुन विवाहितेने आत्महत्या केली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले.
न्यायमूर्ती राव यांनी याबाबत सर्व पुरावे तपासून तसेच युक्तिवाद ऐकून आरोपी गणेश धवणे याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. यावेळी ऍड. रोहित उपाध्याय, ऍड. अजय भक्त, ऍड. यश भेलांडे यांचे सहकार्य लाभले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!