वैशाली गायकवाड यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार
३ डिसेंबर ला दिल्ली येथे होणार सन्मान
डॉ.आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे आयोजन
अमरावती/प्रतिनिधी
शासनाच्या विविध योजनांची वैशिष्ट्यपूर्ण अंमलबजावणी करून त्या योजनांचा खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देणाऱ्या तसेच आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय करत ग्रामपंचायत सोनेगाव(आबाजी) सारख्या गावाला विविध पुरस्कार मिळवून देणाऱ्या आदर्श ग्रामसेवक वैशाली गायकवाड यांना उत्कृष्ठ ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला असून ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, एमआरजिएस अंतर्गत ऑक्सिजन पार्क येथे ६०० वृक्ष लागवड, वैयक्तिक शौचालय बांधकाम, घरकुल योजना,९० टक्के कर वसुली, दलित वस्ती विकास,१५ व्या वित्त अयोग अंतर्गत सार्वजनिक शौचालय तसेच शालेय, आरोग्य, मागासवर्गीय विकासाच्या योजना राबविण्यात वैशाली गायकवाड यांनी आपली कर्तव्यपूर्तता करत सोनेगाव(आबाजी) गावाला विकासाच्या नकाशावर नेऊन ठेवले. देवळी पंचायत समितीच्या वतीने या आधी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीची दखल दिल्ली येथील डॉ. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आली असून त्यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येत्या ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता दिल्ली येथील संविधान भवन येथे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, आदीला फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. एस.आदी नारायणा,डॉ. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव मेमन,डॉ. मनीष गवई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता संविधान भवन दिल्ली येथे उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण होणार आहे. वैशाली गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.