spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी

अमरावती , श्री दादासाहेब गवई चॕरिटेबल ट्रस्ट , अमरावती द्वारा संचालित डाॕ. बाबासाहेब आंबेडकर
महाविद्यालय, उत्तम नगर अमरावती येथे ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागावारा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने त्यांचा जन्मदिवस दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे सचीव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. पी. पायस यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटो चे पुजन करुन अभिवादन केले. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिगत व्हावी यासाठी प्रत्येक विदयार्थ्यांनें वाचन करायला हवे या करीता प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन व प्रास्तविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. सुधिर बा. सांगोले यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदशन करताना डॉ. सांगोले म्हणाले कीं डॉ. कलामांनी सदैव आपल्या कृतीतून समाजाला प्रेरणा दिल्याने ते देशाचे आदर्श ठरले . त्यांच्या मोठेपणाचे बीज त्यांच्या वाचनात दडलेले आहे. आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाच्या द्वारा सर्वाना जगण्याची प्रेरणा दिली. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. ओमप्रकाश एस. बोबडे यांनी केले. आभार प्रदर्शन समाज शाश्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप अंबोरे यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. सुनील कुमार,डॉ. रजनी गेडाम,डॉ. वर्षा गावंडे,डॉ. श्याम तंत्रपाळे,डॉ. राजेश देशमुख,डाॕ. शुध्दोधन कांबळे , डाॕ. एस. बी. सांगोले , प्रा.ए. व्ही. धोटे, प्रा. पी.पी. विधाते, प्रा. शंकर लाहोटी, प्रा. बोराडे, प्रा. बोरकर, प्रा. एच. एच. देशमुख , डाॕ. डी.ए. भगत, प्रा. अनिल पाचकुडके, प्रा. रुद्रा चोपकर, प्रा. सिम्रेला देशमुख,प्रा. भागवत, प्रा. बजाज,प्रा. मेघा चिमणकर, प्रा. ज्योती टाले,श्री.विजय इंगळे, श्री कीशोर बिजवे, सुशांत युवनाते,भाग्यश्री वानखडे सागर सिरसाठ व बहुसंख्येने विदयार्थी उपस्थित होते.
इन

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!