नवरात्रोत्सवात जीवदानी मंदिरावर तिसऱ्या डोळ्याची नजर
जोडीला मोठा पोलीस बंदोबस्त ,भावकांची दर्शनासाठी होणार गर्दी
●आशिष राणे,वसई●
पालघर जिल्ह्यातील विरार मधील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते नवरात्र उत्सवात जीवधन गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.. मंदिरावर 150 सिसिटीव्हीच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणारआहे. त्याच बरोबर कोणताही घातपात होऊ नये म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याच बरोबर नवरात्रोत्सवात गडावर भावीकांची गर्दी होणार असल्याचीही माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान मंदिर सुरक्षेचा आढावा ए टी एस ने सुद्धा घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवच हि उभारण्यात आले आहे. नऊ दिवस मंदिरात होणारी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे 200 एन सी सी चे विद्यार्थी हजर असणार आहेत. हत्यार बंद पोलिसांची तुकडी तैनात असणार. जीवदानी मंदिरात जण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची चाचणी हि यशस्वी झाली आहे.
नवरात्राचे 9 दिवस येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर 50 हजाराच्या आसपास भाविकांची गर्दी होणार आहे. नवरात्रोत्सवात येणाऱ्या रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखांपर्यत जाण्याची श्यक्यता आहे. त्या दृष्टीने नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले.