वसई नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू!
वसईतील खदाणी धोकादायक,तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष
●मिररवृत्त
●आशिष राणे,वसई●
वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. वसई पूर्वेच्या नवजीवन येथे दोन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी तीन च्या सुमारास ही घटना घडली.नसीम रियाजअहमद चौधरी (१३), सोपान सुनिल चव्हाण (१४) अशी या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरातील खदाणी आहेत. पावसाळा असल्याने या खदाणी पाण्याने भरून गेल्या आहे. गुरुवारी दुपारी गांगडीपाडा येथे राहणाऱ्या चार ते पाच जणांचा ग्रुप अंघोळीसाठी खदाणीत गेले होते. अंघोळ करताना नसीम आणि सोपान या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने खदाणीत बुडाले. याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मिळताच मुलांना बाहेर काढून त्यांना रेंज नाका येथील प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नाका तोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून नदी, तलाव, खदाणी, धबधबे अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.