spot_img

हरमन कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याला मागितली खंडणी, अन्यथा कंपनी सुरू होऊ देणार नसल्याची दिली धमकी

हरमन कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याला मागितली खंडणी
अन्यथा कंपनी सुरू होऊ देणार नसल्याची दिली धमकी

◆नांदगावपेठ एमआयडीतील घटना
◆माहुली जहागीर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

एका स्वयंघोषित गुंडाने रंगबाजी करित चक्क नांदगावपेठ एमआयडीसीत सुरू असलेल्या हरमन कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कंपनी सुरू करायची असेल तर दर महा दहा हजाराच्या खंडणीची मागणी केली. माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये निर्माणाधीन असलेल्या हरमन कंपनीमध्ये ही घटना घडली. याबाबत माहुली पोलिसांनी खंडणी बहाद्दरावर गुन्हे दाखल केले आहे.
सुरेश रमेश विऱ्हेकर माहुली जहांगीर असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर तक्रारकर्त्यांचे नाव किशोर विठ्ठलराव ब्राम्हणे, रा.वरूड, जि. अमरावती असे आहे. माहितीनुसार, नांदगावपेठ एमआयडीसीमधील डी ब्लॉकमध्ये प्लॉट क्रमांक ९ मध्ये सध्याघडीला हरमन कंपनीचे बांधकाम सुरू आहे. लवकरच ही कंपनी सुरू होणार असून त्या कंपनीमध्ये शेकडोंना रोजगार मिळणार आहे. तक्रारकर्ते किशोर ब्राम्हणे हे हरमन कंपनीमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी आहेत. आरोपी सुरेश विऱ्हेकर हा नेहमी कंपनीच्या बांधकामावर जाऊन बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला दर महा दहा हजार रूपये देण्याची खंडणी मागत होता.
बांधकाम कंत्राटदाराने हा प्रकार सुरक्षा अधिकारी किशोर ब्राम्हणे यांना सांगितल्याने त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढविली व ते स्व:ही तेथे राऊंडवर येत होते. अशातच आरोपी सुरेश हा २२ मे रोजी दुपारी पुन्हा कंपनीत आला असता किशोर ब्राम्हणे यांनी त्याला अडविले. तेव्हा सुरेशने त्यांना देखील दहा हजाराची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास बांधकाम बंद पाडून कंपनी सुरू होऊ देणार नाही, अशी धमकी सुध्दा त्याने दिल्याने अखेर ब्राम्हणे यांनी याबाबत माहुली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार माहुली पोलिसांनी सुरेश विऱ्हेकर याच्यावर गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढील तपास करित आहेत. वृत्तलिहेस्तोवर आरोपी सुरेशला अटक झालेली नव्हती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!