वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानाची सभापती हरीष मोरे यांनी केली पाहणी
◆मिररवृत्त
◆अमरावती
अमरावती तालुक्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकरी तसेच नागरिकांचे नुकसान झाले.आ.ऍड. यशोमती ठाकूर यांच्या आदेशान्वये कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष मोरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
सोमवारी अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा भगत, देवरा, देवरी, अंतोरा यागावात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.गावात काही घरांची पडझड झाली.अनेक कुटुंब उघड्यावर आलेत. आ. यशोमती ठाकूर यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती हरिष मोरे,अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऍड. अमित गावंडे यांचेसह पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.
हरीश मोरे यांनी ब्राम्हणवाडा भगत, देवरा, देवरी, अंतोरा या तीनही गावातील नागरिक व शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली. घटनास्थळी तहसीलदार लोखंडे यांना देखील पाचारण करण्यात आले होते. विभागाच्या वतीने तातडीने पंचनामा करून शक्य तितक्या लवकर पीडितांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन सभापती हरिष मोरे यांनी दिले.
यावेळी दिलीप सोनवणे,सरपंच शंतनु नीचीत,अक्षय नीचीत, विश्वंभर नीचीत, अंकुश राऊत, पवन बोरकर, उमेश बारबुद्धे, उपसरपंच गजानन देशमुख यांचे सह तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.