spot_img

तन्वी राणे हीचा सभापती हरीष मोरे यांच्या हस्ते सत्कार, दहावी सीबीएसई परीक्षेत मिळविले ९४ टक्के गुण

तन्वी राणे हीचा सभापती हरीष मोरे यांच्या हस्ते सत्कार
दहावी सीबीएसई परीक्षेत मिळविले ९४ टक्के गुण

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

अमरावती तालुक्यातील देवरी येथील तन्वी मंगेश राणे हिने दहावीच्या (सीबीएसई) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.प्रचंड आत्मविश्वास व मेहनतीच्या जोरावर तन्वीने ९४ टक्के गुण मिळविले. कोणत्याही शिकवणीविना तन्वीने मिळविलेल्या यशामुळे तालुक्यात नावलौकिक वाढविला असून मंगळवारी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष मोरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तन्वीचे घरी जाऊन अभिनंदन केले.
नुकताच दहावी सीबीएसई बोर्डचा निकाल लागला असून यामध्ये तन्वी मंगेश राणे हिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. जिद्द, चिकाटी च्या भरवशावर तन्वीने मिळविले यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत हरिष मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी सभापती हरिष मोरे सह अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऍड. अमित गावंडे, दिलीप सोनोने,गजानन देशमुख, प्रमोद राणे,यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तन्वीचे भरभरून कौतुक केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!