spot_img

धावत्या वाहनांमधून उडणाऱ्या राखेबाबत भीम आर्मी सरसावली, कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

धावत्या वाहनांमधून उडणाऱ्या राखेबाबत भीम आर्मी सरसावली

●कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

रतन इंडियामधील राखेची वाहतूक करतांना महामार्गावर वाहनांमधून राख उडून त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.वाहनचालकांच्या डोळ्यात ही राख उडत असल्यामुळे अनेक अपघात घडले शिवाय नागरिकांचे डोळ्यांचे आणि फुफ्फुसाचे आजार देखील वाढलेले आहे याबाबत वृत्तपत्रांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर भीम आर्मीने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन प्रदुषण विभागासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. पाच दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी दिला आहे.
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामधून दररोज लाखो टन राख वाहनांच्या माध्यमातून वाहतूक करण्यात येते. रतन इंडियाने राखेचे व्यवस्थापन करण्याचा कंत्राट डीएनए या स्थानिक कंपनीला दिलेला असून डीएनएच्या माध्यमातून शेकडो वाहनांमध्ये ती राख भरून वीटभट्टी किंवा अन्यत्र ठिकाणी वाहतूक केल्या जाते. दररोज लाखो रुपये निव्वळ नफा या राखेच्या माध्यमातून कमविण्यात येतो मात्र महामार्गावरून जेव्हा राख घेऊन ही वाहने धावतात तेव्हा या वाहनांमधील राख हवेत उडते. महामार्गावर असलेले घर, हॉटेल्स, शेती याठिकाणी उडत असलेल्या राखेने प्रदूषण निर्माण केले असून दुचाकी आणि तीन चाकी चालकांच्या डोळ्यात ही राख उडत असल्याने आजवर अनेक अपघात घडले आणि भविष्यात अनेक दुर्घटना या उडणाऱ्या राखेमुळे होणार आहे.शिवाय महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिकांना या राखेच्या प्रदूषणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे तरीसुद्धा एकही विभाग रतन इंडिया किंवा डीएनए यांच्यावर कार्यवाही करायला पुढे येत नाही.
भीम आर्मीने प्रदूषण विभागाला निवेदन देतांना सर्व वाहने आणि रतन इंडिया व डीएनए यांच्यावर कार्यवाही करून नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. राखेच्या प्रदूषणामुळे भविष्यात अनेक नागरिकांना कॅन्सर, दमा यासारख्या असाध्य रोगांशी सामना करावा लागणार आहे त्यामुळे वेळीच सावध होण्यासाठी सर्वांवर कायदेशीर लगाम आवश्यक आहे.पाच दिवसात कार्यवाही न झाल्यास आपण महामार्गावर राख वाहून नेणारे सर्व वाहने अडवणार असा गर्भित इशारा भीम आर्मी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी प्रदूषण विभागाला दिला आहे.निवेदन देतांना भीम आर्मीचे कार्यकर्ते तसेच काही गावातील गावकरी सुद्धा उपस्थित होते.

‘प्रदूषण, पर्यावरण आणि प्रादेशिक परिवहन विभाग हे रतन इंडिया आणि डीएनए कंपनीचे भागधारक म्हणून काम पाहत आहेत त्यामुळेच कदाचित एवढा महाभयंकर प्रकार घडत असून सुद्धा कोणत्याही विभागाचा अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी धजावत नाही. या तिनही विभागाचे मौन उद्या महामार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरणार आहे त्यामुळे या तीनही विभागाने आपले कर्तव्य चोख बजावावे अन्यथा भीम आर्मी सर्वांनाच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भीम आर्मी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी दिला आहे’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!