spot_img

पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून जवानाची आत्महत्या,कुटुंबीयांचा आक्रोश, नांदगाव पेठ पोलीस ठाण्यावर धडक,आसाम येथे होता कार्यरत

पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून जवानाची आत्महत्या

●कुटुंबीयांचा आक्रोश, नांदगाव पेठ पोलीस ठाण्यावर धडक
●आसाम येथे होता कार्यरत

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

आसाम याठिकाणी कार्यरत असणाऱ्या आणि सैन्यदलात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जवानाने पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास रहाटगाव रिंगरोड नजीक घडली.विशाल विनोदराव चव्हाण (३६) रा.रहाटगाव (मूळ गाव नया अकोला) असे मृतकाचे नाव आहे. पत्नीसह तिघांवर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर जमाव उसळल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की,विशाल हा भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून सध्याघडीला आसाम येथे कर्तव्यावर आहे.विशालचे वडील सुद्धा सैन्यातून निवृत्त झाले असून सैन्यात अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष अशी विशालची ओळख आहे.काही दिवसांपूर्वी विशाल सुटीवर आपल्या घरी परतला होता.विशाल गेल्या अनेक वर्षापासून पत्नीकडून विविध अवाजवी कारणांसाठी होणाऱ्या जाचक त्रासाला कंटाळला होता. त्याने याबाबत पत्नीच्या आईवडीलांकडे अनेकवेळा तक्रारही केली होती. पण, आईवडीलांनी मुलीची समजूत काढण्याऐवजी मुलीसह मिळून विशालचा आणखी छळ सुरू केला. म्हणूनच त्याने गेल्या दोन, तीन वर्षापासून सुट्टीवर घरी येणे कमी केले होते.
काही दिवसापूर्वी विशाल सुट्टीवर अमरावतीत रहाटगावमध्ये घरी आल्यनंतर पत्नीसह तिन्ही आरोपींनी त्याचा अतोनात छळ सुरू केला. परंतु, यावेळी छळ असह्य झाल्याने विशालने रविवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब उघड होताच विशालच्या आईवडीलांसह सर्व नातेवाईक, त्याचे मित्र व रहाटगाव परिसरातील शेकडो नागरिकांमध्ये अचानक रोष उफाळला होता.विशाल पत्नीकडून होणाऱ्या मानसीक त्रासाने त्रस्त असल्याची जाणीव सर्वांना होती. त्यामुळे विशालचे नातेवाईक व मित्रांनी दुपारी नांदगावपेठ पोलीस ठाण्यावर धडक देऊन पत्नीसह तिच्या आईवडीलांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तो पर्यंत पंचनामा व पोस्टमार्टम होऊ देणार नाही,असा पवित्रा जमावाने घेतल्याने पोलिसांनी विशाल च्या कुटुंबियांच्या तक्रारी वरून विशालच्या पत्नीसह तिच्या आईवडीलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतच्या कलमान्वे गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून विशालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शवगृहात दाखल केला.घटनेने समाजमन सुन्न झाले असून विशालच्या अश्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

◆विशालच्या मृतदेहावर नया अकोला येथे अंत्यसंस्कार◆

उत्तरीय तपासणीनंतर विशालच्या मृतदेहावर नया अकोला येथे सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी गावकऱ्यांनी तसेच मित्रपरिवार व कुटुंबीयांनी जड अंतःकरणाने विशालला अखेरचा निरोप दिला यावेळी अनेकांची डोळे पणावली होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!