spot_img

‘त्या’ वीटभट्टीधारकांसाठी तुषार भारतीय ठरले ‘देवदूत’, एका तासात दिल्लीहून हलविले सूत्र, भारतीय यांच्या फोनवरून थांबविली कारवाई

‘त्या’ वीटभट्टीधारकांसाठी तुषार भारतीय ठरले ‘देवदूत’

◆एका तासात दिल्लीहून हलविले सूत्र

◆भारतीय यांच्या फोनवरून थांबविली कारवाई

◆मिररवृत्त
◆अमरावती

स्थानिक आमदाराची हुजरेगिरी करत महसूल प्रशासनाने कोंडेश्वर मार्गावरील अनेक वीटभट्टयांवर बुलडोजर चालवून अनेक वीटभट्ट्या उद्धवस्त केल्यात.वीटभट्टी मालकांनी तसेच कामगारांनी विनवणी करूनही महसूल विभाग कारवाई करण्यावर ठाम होता. अश्यावेळी भाजप नेते तुषार भारतीय यांना वीटभट्टी मालकांनी तातडीने फोन करून घटनेबाबत सूचना दिली. भारतीय त्यावेळी दिल्लीला होते मात्र त्यांनी थेट दिल्लीहून सूत्र हलवून केवळ एका फोनवर ही कारवाई थांबल्यान वीटभट्टी मालकांसाठी तुषार भारतीय खरे देवदूत ठर ले.
बुधवारी सकाळी अचानक महसूल विभागाच्या वतीने कोंडेश्वर मार्गावरील असलेल्या विटाभट्टीवर कारवाई करण्यात आली.बुलडोजरच्या मदतीने अनेक वीटभट्ट्या यावेळी महसूल विभागाच्या टीम ने उध्वस्त केल्या. अनेक वर्षांपासून आ वीटभट्ट्या याठिकाणी असून जवळ जवळ पाच हजार कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून महसूल विभागाने हे दुष्कृत्य करून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली. वीटभट्टी मालकांनी,कामगारांनी कारवाई थांबवावी म्हणून प्रशासनाला विनंती केली मात्र आमदाराच्या दबावात ही कारवाई होत असल्याने प्रशासन तेथून हटण्यास तयार नव्हते.अश्यातच काही मालकांनी तात्काळ तुषार भारतीय यांना फोन केला, भारतीय हे दिल्लीला होते मात्र व्यावसायिक आणि कामगारांची बाजू समजून घेऊन त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला व ही कार्यवाही थांबविण्यासाठीविनंती केली.
पंधरा दिवसांच्या मुदतीच्या अटीवर महसूल विभागाने ही कार्यवाही थांबविली वेळीच भारतीय यांनी दखल घेतल्याने व वीटभट्टी मालकांचे नुकसान थांबविल्यामुळे अजय मोरवाल,कैलास रोतडे, प्रवीण सामने, बंडू खडेकर, संजय मारवने, स्वप्नील लाड, नितीन दरोली, मुन्ना बेग, श्याम दांबे, अशपाक चौधरी, असिफ बेग, रवींद्र लाड, नरेंद्र मदने, अजय मोरवल, सुरज मलीये,प्रवीण मलीये, विजय इंगोले, सुधाकर खोब्रागडे, योगेश मेश्राम आदीं वीटभट्टी मालक आणि कामगार वर्गाने तुषार भारतीय यांचे आभार व्यक्त केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!