spot_img

कोंबड्यांचे खाद्य घेऊन जाणारा ट्रक नांदगावपेठ जवळ गायब ! ओडिशा येथून मुंबईसाठी झाला होता रवाना, कर्नाटकच्या व्यापाऱ्याला साडे तीन लाखांचा फटका

कोंबड्यांचे खाद्य घेऊन जाणारा ट्रक नांदगावपेठ जवळ गायब

◆ओडिशा येथून मुंबईसाठी झाला होता रवाना
◆कर्नाटकच्या व्यापाऱ्याला साडे तीन लाखांचा फटका

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

ओडीसा येथून कोंबड्याचे खाद्य भरून मुंबईला निघालेला ट्रक नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायब झाला. चालकाचे शेवटचे लोकेशन नांदगावपेठ टोलनाका होते. ट्रक चालक मालासह फरार झाल्याने कर्नाटक मधील व्यापाऱ्याला तब्बल ३ लाख ५० हजाराचा फटका बसला आहे. याबाबत नांदगावपेठ पोलिसांनी फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
कय्युम तैय्यब शेख, रा. राजनगाव, वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद असे गुन्हे दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तर तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे नाव सैय्यद रसुल गुड्डू साहेब (३५) रा. रहमत नगर, गुलबर्ग, कर्नाटक असे आहे. कय्युम तैय्यब हा एमएच-१३-डीक्यू-८१२४ क्रमांकाच्या ट्रकवर चालक आहे. कय्युम तैय्यब गत एप्रिल महिन्यात औरंगाबादहून कर्नाटक राज्यातील गुलबर्ग येथे माल घेऊन पोहचला. तेथे माल खाली केल्यानंतर ट्रान्सपोर्टवाल्यांच्या लिंकनुसार त्याला सैय्यद रसुल यांचे ओडीसाचे भाडे मिळाले. सैय्यद रसुल यांना ओडीसाला काही माल पोहचवायचा होता आणि तेथूनच एका कंपनीमधून कोंबड्याचे खाद्य घेऊन ते मुंबईला त्यांच्या गोदामामध्ये पाठवायचे होते. अशा प्रकारे सैय्यद रसुल यांनी कय्युम तैय्यब याला अप-डाऊनचे दुहेरी २ लाख ३० हजाराचे भाडे दिले. भाडयाची संपूर्ण रक्कमही सैय्यद रसूल यांनी कय्युम तैय्यबला दिली. त्यानुसार कय्युम तैय्यब २० एप्रिलला ओडीसामध्ये पोहचला. त्याने तेथे रसूल यांनी सांगितलेल्या कंपनीतून १ लाख २० हजार रूपयाचे कोंबडयाचे खाद्य घेतले आणि तो मुंबईला निघाला. २ मे ला तो ट्रक अमरावतीत नांदगावपेठ पर्यंत पोहचला. तोपर्यंत रसूल सतत कय्युम तैय्यबसोबत मोबाइलवर संपर्कात होता. परंतु, अचानक त्याचा फोन बंद झाल्याने आणि काहीच ठावठिकाणा नसल्याने अखेर सैय्यद रसुल हे मुंबईहून अमरावतीत आले आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात कय्युम तैय्यब विरोधात तक्रार दिली. याबाबत नांदगावपेठ पोलिसांनी कय्युम तैय्यब विरोधात ३ लाख ५० हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी पुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याची शोधमोहिम सुरू केली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!