spot_img

नांदगाव पेठ मध्ये रात्री ८ पर्यंत चालली मतदान प्रक्रिया, ६६.४६ टक्के झाले मतदान,मतदारांमध्ये कमालीचा उत्साह

नांदगाव पेठ मध्ये रात्री ८ पर्यंत चालली मतदान प्रक्रिया

■६६.४६ टक्के झाले मतदान,मतदारांमध्ये कमालीचा उत्साह

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

२६ एप्रिल रोजी राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. शहरासह ग्रामीण भागात देखील यावेळी मतदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. नांदगाव पेठ मध्ये यावेळी सरासरी ६६.४६ टक्के मतदान पार पडले असून रात्री ८ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली. नियोजनाचा अभाव असल्याने अनेक बूथवरून मतदार आल्यापावली परत गेल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले.
निवडणूक विभागाच्या वतीने नऊ ठिकाणी मतदान प्रक्रियेसाठी बूथ लावण्यात आले होते. अनेक मतदान केंद्रावर नियोजनाचा अभाव असल्याने तसेच मतदारांची गर्दी वाढल्याने दोन दोन तास मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. अबालवृद्ध मतदारांसाठी कोणत्याही उपाययोजना विभागाच्या वतीने करण्यात आल्या नव्हत्या. बूथ क्र.२३५ वर सकाळी ७ वाजतापासून मतदारांचा उत्साह पाहण्यास मिळाला, कधी नव्हे असा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मतदारांनी दिला त्यामुळे या बूथवर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
एकूण ११७४७ मतदारांपैकी ७८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये अनेक युवक व युवतींनी आपले प्रथम मतदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी नोंदवला. नांदगाव पेठ मध्ये अतिशय शांततेत आणि सुरळीत ही मतदान प्रक्रिया पार पडल्यामुळे मतदारांनी निवडणूक निर्णय विभागासह, पोलीस प्रशासन, महसूल विभाग,ग्रामपंचायत आणि विशेष नेमण्यात आलेल्या पिंक फोर्स चे आभार व्यक्त केले.

‘यादीत नाव नसल्यामुळे तसेच मतदान केंद्रावर धीम्या गतीने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे यावेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना परत जावे लागले. त्यामुळे प्रशासनाने भविष्यात मतदारांना अधिक चांगल्या सुविधा दिल्यास मतदानाचा टक्का वाढेल आणि प्रशासन घेत असलेल्या मेहनतीला अधिक रंग येईल. शासनाने मतदान जागृती आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबविलेले उपक्रम स्तुत्य असून अभिनंदनिय आहे’

■नितीन हटवार, माजी जि.प. सदस्य

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!