spot_img

आ.हितेंद्र ठाकूर यांची प्रकृती बिघडली,रुग्णालयात दाखल

आ.हितेंद्र ठाकूर यांची प्रकृती बिघडली,रुग्णालयात दाखल

◆मिररवृत्त
◆वसई-आशिष राणे

बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना विरार च्या प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या आ.ठाकूर यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. भवर यांनी सांगितले.
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घशाला झालेला संसर्ग आणि दगदग व अतिश्रमामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आ. हितेंद्र ठाकूर हे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पालघर लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले नसल्याने शुक्रवारी उलट सुलट चर्चा सुरु होत्या मात्र आता त्याचे नेमकं व खरं कारण समोर आले असून दोनच दिवसापूर्वी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्या नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान शनिवारी आम हितेंद्र ठाकूर यांची प्रकृती स्थिर असल्याचे “प्रकृती” रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!