spot_img

मध्यरात्री महिलेसह मुलाला चाकूच्या धाकावर केले बंदिस्त, राजेश्वरी नगरात महिला लिपिकाच्या घरात दोन लाखाचा दरोडा, दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवला मुलाच्या गळयावर चाकू

मध्यरात्री महिलेसह मुलाला चाकूच्या धाकावर केले बंदिस्त

◆राजेश्वरी नगरात महिला लिपिकाच्या घरात दोन लाखाचा दरोडा

◆दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवला मुलाच्या गळयावर चाकू

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

अज्ञात तीन बुरखाधारी दरोडेखोरांनी बुधवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास जलसंपदा विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या महिलेच्या घराला ‘टार्गेट’ करत चाकूच्या धाकावर महिलेसह ७ वर्षाच्या मुलाला बंदीस्त करून २ लाखाचे दागिने लुटले. नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजेश्वरी नगरात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस विभाग चांगलाच हादरला आहे. लुटारूंनी अर्धा तास मुलाच्या गळयावर चाकू ठेवला होता.
सोनाली भाऊराव पाटील (३६) असे तक्रारकर्त्या पिडीत महिलेचे नाव आहे. सोनाली पाटील ह्या राजेश्वरी नगरातील घरामध्ये त्यांच्या सात वर्षाच्या मुलासह राहतात.प्रवीण नगरात मुलाकडे राहणारे त्यांचे आईवडील अधून-मधून सोनाली यांच्या घरी येऊन राहतात. १६ एप्रिलला रात्री आईवडील मोठया भावाकडे मुक्कामी गेले असल्याने घरात सोनाली व त्यांचा मुलगा हे दोघेच होते. दोघही रात्री घरातील बेडरूममध्ये झोपले असताना अज्ञात तीन बुरखाधारी युवकांनी घराच्या मागील बाजूच्या दाराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये आल्यानंतर लुटारूंनी लाईट सुरू करून सोनाली यांना उठविले. सोनाली उठताच एका लुटारूने त्यांचे तोंब दाबून त्यांना चाकूचा धाक दाखविला. लुटारूंनी कोणतीही धमकी न देता, अश्लिल भाषेचा वापर न करता सोनाली यांना चुपचाप रहाल तर काहीच होणार नाही, असे म्हटले. त्यानंतर एकाने सात वर्षाच्या मुलाला उठवून जवळ घेत त्याच्या गळयावर चाकू लावला. आरडाओरड कराल तर मुलाचा जीव जाईल, घरात जे काही पैसे, दागिने असेल ते द्या, असे फर्मान लुटारूंनी सोनाली यांच्यावर सोडले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता सोनाली यांनी अलमारीतून दागिण्यांची बॅग काढली. त्यांनी बॅगमधील सुमारे२ लाख रूपये किमतीचे मंगळसुत्र, नेकलेस, टॉपसह सर्व दागिने काढून लुटारूंच्या हाती दिले व मुलाला सोडून देण्याची विनंती केली. एवढेच नव्हे तर तुम्ही गेल्यावर मी काहीच आरडाओरड करणार नाही, असेही सोनाली लुटारूंना म्हणाल्या. तरी देखील लुटारूंनी संपूर्ण घरातील खोल्यांमधील अलमारी, ड्रॉव्हर हुसकल्यानंतर त्यांच्या घरातून निघाले.
लुटारू गेल्यानंतर सोनाली यांनी शेजारच्या लोकांना फोन करून ही माहिती दिल्यानंतर संपूर्ण राजेश्वरी नगरात खळबळ उडाली. कुणीतरी याबाबत नियंत्रण कक्षात माहिती दिली. माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांसह आयुक्तालयाच्या हद्दीत रात्रगस्तीवर असलेले पोलीस पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच येथे ठसे तज्ज्ञ, श्वान पथक, फॉरेन्सीक टीमलाही प्राचारण करण्यात आले. १७ एप्रिलला पहाटे गाडगेनगर पोलीस, गुन्हेशाखा, सीपी स्पेशल स्कॉड, सीपींसह बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. याबाबत नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी युध्दपातळीवर आरोपींची शोधमोहिम सुरू केली आहे.

‘प्रेमाने संवाद साधून मुलाकडून घेतली माहिती
एरव्ही दरोडेखोर अश्लिल भाषेत शिविगाळ करून धमकी देतात. पण ज्या लुटारूने तब्बल अर्धातास मुलाच्या गळयावर चाकू ठेवला त्याने मुलाशी अतिशय प्रेमाने संवाद साधला. तो कोणत्या शाळेत शिकतो, कोणत्या वर्गात आहे, शाळेत कसा जातो, काय-काय आवडते वैगरे-वैगरे माहिती त्याने घेतली. याच माहितीच्या आधारे लुटारूंनी सोनाली यांना पोलीसात तक्रार केल्यास मुलाचे स्कुलमधून अपहरण करण्याची धमकी दिली’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!