तेली समाज संघटनेच्या वतीने भीम अनुयायांना शीतपेय वाटप
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त शासकीय वसाहत मधील भीमशक्ती मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमधील अनुयायांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या वतीने दरवर्षी न चुकता हा उपक्रम राबविण्यात येतो.
शासकीय वसाहत मधील भीमशक्ती मंडळाच्या वतीने दरवर्षी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते.ही मिरवणूक शासकीय वसाहत येथून श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी जाते.मिरवणुकीमध्ये असणाऱ्या हजारो अनुयायांसाठी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात येते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी संताजी कॉम्प्लेक्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांच्यावतीने अभिवादन करण्यातआले त्यानंतर शेकडो भीम अनुयायांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी किशोर साखरवाडे, सचिन तायडे, अमोल इंगोले, मंगेश तायडे, मंगेश गाडगे दिनेश पाटील चांदु राजूरकर, गौरव वाघ,नंदु राजूरकर रामभाऊजी साखरवाडे, अतुल धर्माळे,योगेश धर्माळे, बाळू शिरभाते सुभाष वाघ, सौं वैशाली सचिन तायडे, सौं दुर्गाताई किशोर साखरवाडे, सौं कलावंताबाई रामभाऊजी साखरवाडे, सौं नंदाताई सुभाष वाघ, नव्या सचिन तायडे ,शौर्य किशोर साखरवाडे,सोहम सचिन तायडे,जयकिशन कानेकर,शैलेश कानेकर यांचेसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.