spot_img

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विचार ऊर्जा देणारे-विवेक गुल्हाने

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विचार ऊर्जा देणारे-विवेक गुल्हाने

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

जगभर ज्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला ऊर्जा देणारे आहेत.महापुरुषांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढून त्यांचे सर्वसमावेशक कार्य किती देशहिताचे होते हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन स्व.हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्य कांबळे पुरा येथील बुद्ध विहारात ते सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्धविहार याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दानशूर व्यक्तिमत्व तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे स्व.हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांचा बुद्ध विहार समितीच्या वतीने सत्कार आयोजित केला होता. याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार मंगेश तायडे तसेच नोटरी सेवेसाठी येथील ऍड.निलेश मरोडकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार आयोजित करण्यात आला होता.
बुद्ध विहार समितीच्या वतीने विवेक गुल्हाने, मंगेश तायडे, निलेश मरोडकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मंगेश तायडे आणि निलेश मरोडकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून अनुयायांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्याशुभेच्छा दिल्या.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुळे, मंगेश गाडगे, भाजपचे पदाधिकारी सचिन इंगळे, आकाश गुल्हाने, वीरेंद्र लंगडे, विलास पाटील, राहुल कांबळे, दिनेश कांबळे सचिन कांबळे, सत्यपाल इंगळे, दिनेश इंगोले, प्रकाश गडलिंग,अमोल कांबळे,सतीश कांबळे ,योगेश कुकडे, आकाश गडलिंग, सुमित कांबळे यांचेसह असंख्य अनुयायी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!