spot_img

नांदगाव पेठ येथील सभेत नितेश कराळे व शरद कोळी यांची तुफान फटकेबाजी , केंद्र व राज्य सरकारसह राणा दाम्पत्यावर शाब्दिक हल्लाबोल, बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सभेत नागरिकांची अलोट गर्दी◆

नांदगाव पेठ येथील सभेत नितेश कराळे व शरद कोळी यांची तुफान फटकेबाजी

◆केंद्र व राज्य सरकारसह राणा दाम्पत्यावर शाब्दिक हल्लाबोल◆

◆बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सभेत नागरिकांची अलोट गर्दी◆

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

जुमलेबाज केंद्र सरकार व विश्वासघातकी राज्यसरकार यांनी उभा केलेला उमेदवार देखील त्यांच्यासारखाच नौटंकीबाज आहे. दलबदलू आणि खोट्या मायाजाळात अमरावतीकरांना गुरफुटून ठेवणाऱ्या राणा दाम्पत्याचा आता घडा भरलेला आहे त्यांचा पराभव करून शेतकरीपुत्र व प्रामाणिक उमेदवार बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना नेते शरद कोळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते नितेश कराळे यांनी केले. नांदगाव पेठ येथे महाविकास आघाडीच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी ग्रामपंचायत परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नांदगाव पेठ परिसरातील जमलेल्या गर्दीला मार्गदर्शन करतांना कराळे गुरुजी आणि शरद कोळी यांनी भाजप सरकार व नवनीत राणा यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. यांच्या भाषणाच्या फटकेबाजीचा परिसरातील नागरिकांनी आस्वाद घेत बळवंत वानखडे यांना निवडून देण्याचा दृढ निश्चय केला. लोकांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचून अमरावती शहराचे नाव खराब करणाऱ्या नवनीत रराणा यांचा पराभव अटळ आहे.हनुमान चालीसा पठणाचे विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन नाटक करणाऱ्या राणा दाम्पत्याला त्यांच्या कर्माची फळ आता मिळायला सुरुवात झाली असून शनिवारीच त्यांचा हायटेक प्रचार कार्यालय निसर्गाने उध्वस्त केले हा एक त्यांच्या पराभवाचा संदेश असल्याचे शरद कोळी यावेळी म्हणाले.
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या भाजपचे इलेक्ट्रॉल बॉण्ड सारखे भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग अवलंबून नागरिकांना चुना लावण्याचे काम केले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव न देता आवश्यक साहित्याच्या किंमती वाढवून शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपला आता कायम हद्दपार करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता प्रामाणिक लोकांनाच संधी देण्याचे कराळे गुरुजी म्हणाले.नांदगाव पेठ येथे मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय राणा दाम्पत्याने पळवून येथे येणाऱ्या उद्योगांना विरोध करणाऱ्या नवनीत राणा यांनी लोकांच्या पोटावर मारून बेरोजगारी वाढविण्यासाठी हातभार लावल्याचा आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी केला. अमरावतीकरांचे भले करण्याऐवजी स्वतःचे भले करण्याचा उद्योग विद्यमान खासदार नवनीत राणा करीत आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू, कोणत्याही परिसरातील नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खात्री देत विजयी होण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद द्यावे अशी उपस्थितांना विंनंती केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गावकऱ्यांनी उत्साहात तसेच फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत केले. उमेदवार बळवंत वानखडे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामदैवत संत काशिनाथ महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.संत काशीनाथ महाराज सभागृहाजवळ बळवंत वानखडे यांच्या प्रचार कार्यालयाचे आ. यशोमती ठाकूर यांचेसह मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी खा.अनंत गुढे अंजली ठाकरे,माजी आ. ज्ञानेश्वर धाने पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरीश मोरे, सुधीर सूर्यवंशी, कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमित गावंडे, नांदगाव पेठ येथील सरपंच कविता डांगे,उपसरपंच मजहर खान, आशिष धर्माळे, नितीन हटवार, श्याम देशमुख, संध्या सव्वालाखे,बाळासाहेब हिंगणिकर,विनोद डांगे, राजेश बोडखे, बाळासाहेब देशमुख, पंकज शेंडे, मोरेश्वर इंगळे, चंदू राऊत,कैलास मोरे, प्रवीण हरमकर,आसावरी देशमुख वृषाली इंगळे यांचेसह महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते.

◆बौद्ध समाजाचा खरा उमेदवार फक्त बळवंत वानखडे◆

आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेकांनी दावेदारी केली असली तरी बौद्ध समाजाचा खरा उमेदवार फक्त बळवंत वानखडे हेच आहे. बौद्ध समाजाने कोणत्याही संभ्रमात न राहता व विरोधकांच्या राजकारणाला बळी न पडता बळवंत वानखडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे. आज सर्वच समाजातील लोक बळवंत वानखडे यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे बौद्ध समाजाने देखील आपला उमेदवार लोकसभेत कसा जाईल याकरिता प्रयत्न करून बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!