spot_img

वैचारिक मागासलेपण सुधारण्याची गरज- अतुल गायगोले, एकता रॅलीतून दिला एकोप्याचा संदेश , इर्विन चौकात अवतरला लाखो भीमसैनिकांचा जनसागर

वैचारिक मागासलेपण सुधारण्याची गरज- अतुल गायगोले

◆एकता रॅलीतून दिला एकोप्याचा संदेश

◆इर्विन चौकात अवतरला लाखो भीमसैनिकांचा जनसागर

◆मिररवृत्त
◆अमरावती

विविध समाजाच्या लोकांनी शिक्षण घेऊन आपली प्रगती केली आहे मात्र आज अनेक लोक मोठ्या पदावर असतांना देखील जातीभेद पाडतात.काळ बदलला मात्र मानसिकता बदलली नसल्याने त्यांचे वैचारिक मागासलेपण दूर करण्याची आज गरज असल्याचे मत शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे संचालक,शिक्षणतज्ञ अतुल गायगोले यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने इर्विन चौक येथे अभिजीत बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. विकास आमटे, एकता रॅलीचे संयोजक राजीव नन्नावरे, गोविंद कासट, डॉ.सुभाष गवई,मनीष गवई, यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना अतुल गायगोले म्हणाले की,सर्व समाजातील लोकांनी शिक्षण घेऊन आज प्रगती केली आहे.परंतु त्यांच्यामध्ये अद्यापही वैचारिक प्रगल्भता आलेली दिसत नाही. जुन्या घटनांना घेऊन आजही विविध समाजाचे लोक आपल्या वैचारिक मागासलेपणाचं दर्शन घडवून आणतांना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इतर समाजाच्या लोकांच्या घरी असला तर आजही त्या फोटोबद्दल लोकांना प्रश्न पडावे ही शोकांतिका असल्याचे अतुल गायगोले यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान आज सर्व समाजातील लोकांनी कोणताही जातीभेद न ठेवता एकत्र येऊन एकोपा जपला पाहिजे असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने सामूहिक अभिवादन सोहळा,राष्ट्रीय एकात्मता संदेश, भीम पर्व विशेषांक सोहळा, संगीतमय गीतांचा बहारदार कार्यक्रम, सांस्कृतिक व रंगारंग कार्यक्रम, कला,नृत्य सादरीकरणसह विविध कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.लाखो अनुयायांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त करून भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ.मनीष गवई यांनी केले कार्यक्रमाला हजारो अनुयायायी व नागरिक उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!