सव्वा कोटींचा १०० पोते गुटखा जप्त; पार्सल कंटेनर मधुन वाहतूक
◆परतवाडा-बैतुल मार्गावर कारवाई;१ आरोपी अटकेत
◆मिररवृत्त
◆अमरावती
परतवाडा पोलिसांनी शुक्रवारी परतवाडा-बैतुल मार्गावर नाकाबंदी दरम्यान केलेल्या तपासणीत पार्सल कंटेनर मधून होत असलेली गुटखा तस्करी उघडकीस आली. या कारवाईत सव्वा कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपी आजाद खान हारुन खान (20,रा.चोडपुर ता. भिलावाडी जि. अलवर राजस्थान) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
कंटनेर क्रमांक RJ 52 GA 3742 मध्ये परतवाडा मार्गे प्रतिबंधीत गुटखा महाराष्ट्रात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. त्या माहिती आधारे पोलीसांनी अन्न व औषध प्रशासन व सरकारी पंच यांचे सह बैतुल रोड परतवाडा येथे मुस्लीम कब्रस्तान जवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान मध्यप्रदेश बैतुल कडुन येणारा कंटनेर क्रमांक RJ 52 GA 3742 ची पंचा समक्ष तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत पानमसाला व संगधीत तंबाखु चे 100 पोते मिळून आले. या कारवाईत वाह कंपनीचा पान मसाला व सुंगधीत तंबाखु 75 पोते किमंत 49,68,750/- रुपये व बहार हेरीटेज पान मसाला व हेरीटेज सुंगधीत तंबाखु 25 पोते किमंत 17,50,000/- रुपये तसेच पान मसाला गुटखा वाहतुकीस वापरलेले कंटेनर किमंत अंदाजे 50,00,000/- रुपये असा एकुण 1 कोटी 17 लाख 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढिल तपास परतवाडा पोलीस करत आहे.