‘फाईंड माय इंटरेस्ट’ शैक्षणिक चळवळीचा अमरावतीतुन शुभारंभ
◆रविवारी विद्यार्थी व पालकांसाठी महत्वपूर्ण कार्यशाळा
◆प्रसिद्ध वक्ते सचिन बुरघाटे सह तज्ञांचे लाभणार मार्गदर्शन
◆मिररवृत्त
◆अमरावती
विद्यार्थ्यांमध्ये वाढती शैक्षणीक स्पर्धा,अपेक्षांचे ओझे आणि कौशल्य बाजूला सारून जाहिरातबाजीच्या भपक्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या पालकांना योग्य दिशा दाखविण्यासाठी फाईंड माय इंटरेस्ट या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन सत्राचे आयोजन उद्या रविवार दि.१७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पीडिएमसी परिसर अमरावती येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमामध्ये प्रेरणादायी वक्ते सचिन बुरघाटे यांचेसह तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व त्यांचे अनुभव कथन उपस्थितांना लाभणार आहे.
मुलांचे भवितव्य घेऊन आज अनेक पालक चिंतेत आहे.त्या सर्व पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य ओळखून त्यादृष्टीने पालकांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चालना देणे आवश्यक असतांना आजच्या काळात केवळ मोठमोठ्या शैक्षणिक जाहिरातबाजीच्या भपक्यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना नको त्या क्षेत्रात बळजबरी करण्याचा पालकांचा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी फाईंड माय इंटरेस्ट ही चळवळ देशभर राबविब्यात येणार असून त्याचा शुभारंभ रविवार दि.१७ मार्च रोजी अमरावतीत होत आहे.
आपल्या पाल्यांचे कौशल्य ओळखून ज्या पालकांनी पाल्यांना वेळीच घडविले आणि आज विविध क्षेत्रात ते प्रगतीपथावर आहेत असे अमरावती मधील दिग्दर्शक मिलिंद ढोके व शिवेंदू देशमुख यांचा पालकांसह कार्यक्रमस्थळी सत्कार होणार आहे शिवाय ते त्यांचे अनुभव कथन करणार आहे तसेच आपल्या छंदाला जोपासून यशाचे शिखर गाठणारे सुहास शिंदे व स्नेहल शिंदे यांचा सुद्धा याठिकाणी सत्कार करण्यात येणार असून त्यांचेही महत्वपुर्ण मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.
अमरावतीत पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या फाईंड माय इंटरेस्ट कार्यक्रमाची उत्सुकता अमरावतीकरांना लागली असून पालक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ही चळवळ अधिक प्रभावी व्हावी तसेच शैक्षणिक व्यवसायिकरणाच्या मायाजाळातुन व मोहजाळातून आपल्या लाडक्या पाल्यांना मुक्त करावे याकरिता रविवारी होणाऱ्या फाईंड माय इंटरेस्ट कार्यक्रमाला पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.