spot_img

फ्रॉजन कॅफेवर धाड,५ जोडपी सापडली रंगेहात, शहरात कॅफे-आईस्क्रीम पार्लरच्या पांघरुणात रंगरंगेलीचे अड्डे!

शहरात कॅफे-आईस्क्रीम पार्लरच्या पांघरुणात रंगरंगेलीचे अड्डे❗

फ्रॉजन कॅफेवर धाड,५ जोडपी सापडली रंगेहात

◆३०० रुपयात एक तास बंद कॅबिन

◆मिररवृत्त
◆अमरावती

शहरात आधुनिक कॅफेच्या गोंडस पांघरुणाखाली रंगरंगेलीचे अड्डे सुरु आहेत. शुक्रवारी अश्याच एका आलिशान कॅफेवर पोलिसांनी धाड घातली. पोटे टाऊनशीप जवळील आराधना रेसिडेन्सी येथे आरोपी दीप वितोंडे याने तीन दुकाने मिळून थाटलेल्या फ्रॉजन कॅफेवर टाकलेल्या धाडीत येथील विविध बंद कॅबिनमध्ये ७-८ तरुण जोडपी (शाळा-महाविद्यालयाचे मुले-मुली) अश्लील चाळे करतांना दिसून आली. त्यापैकी ५ जोडप्याना पोलिसांनी अटक केली आहे. कठोरा नाका-पोटे टाऊनशिप या मार्गावर जोडप्याना रंगरंगेलीची सोय असलेली अशी अजून ५-६ ठिकाणे आहेत. तर शहरातील अन्य भागातही अश्या अनेक कॅफे-आईस्क्रीम पार्लरचे पीक आले आहे.

बाहेर फ्रोजन डिलाईट आईस्क्रीम पार्लर, आईस्क्रीम अँड कॉफी वर्कशॉप अश्या नावाने सुरु या रंगरंगेली केंद्रात ३०० रुपये प्रतितास या ठरलेल्या दरानुसार जोडप्याना बंद कक्षात काहीही करण्याची सोय आहे. यासाठी त्याने डझनभरापेक्षा जास्त गोपनीय कॅबीनची रचना केली आहे. युगलांना लागणाऱ्या एकांताची विशेष सुविधा मिळत असल्याने या कॅफेत दिवसभर व रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणींची लक्षणीय वर्दळ असते. या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घातलेल्या धाडीत येथील बंद कॅबिनमध्ये बिनधास्तपणे सुरु असलेला सदर गैरप्रकार उजेडात आला. आता शहरातील अन्य भागात सुरु झालेल्या अश्या सर्व ठिकाणांचाही शोध घेणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!