spot_img

शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी धाने पाटील यांची नियुक्ती , महानगरात होईल ऐतिहासिक आयोजन

शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी धाने पाटील यांची नियुक्ती

◆महानगरात होईल ऐतिहासिक आयोजन

◆मिररवृत्त
◆अमरावती

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवसेना उबाठा, युवासेना व महिला आघाडी च्या वतीने शिवजयंती उत्सव ऐतिहासिक स्वरूपात साजरा केला जाईल. नुकतीच महानगरप्रमुख पराग गुढदे
यांनी विश्राम भवन येथे नियोजन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने अमरावती महानगर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे उत्सव समितीमध्ये शिवसैनिक नितीन तारेकर ,अशोकराव इसल, जयंतराव इंगोले, गढवाल काका, वसंत गौरखेडे ,बाळासाहेब विखे पाटील, उमेश वाट, उमेश सेवक, गजानन गुजरे ,योगेश धर्माळे ,डॉक्टर जुबेर भाई यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सल्लागार समितीमध्ये गोपाल राणे, नितीन हटवार, डॉक्टर निर्मळ, दिगंबर मानकर ,किसन लळे ,विजय बेनोडकर ,राजीव दारोकार ,राजू अक्कलवार, किशोर पवार ,महेश भिंडा,कुचीन कैथ्वास यांची नियुक्ती करण्यात आली. आयोजन समिती मध्ये 15 कार्यकर्त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे यामध्ये अनिल नंदनवार ,प्रतीक अब्रूक ,पुरुषोत्तम हरडे ,गजानन गोमासे, रामहरी ओलीउकर ,सचिन वाडकर ,सुभाष तायडे ,शेखर घिमे ,संजय देशपांडे, राजीव पुसदकर, सुरेश चौधरी, संदीप पवार ,बंडू सरोदे, राजेश प्रधाने ,राजू सोनवणे यांचा समावेश आहे .या नियोजन बैठकीत संजय शेटे सुनील राऊत ,पंजाबराव तायडे, विजय ठाकरे ,युवा सेना जिल्हाप्रमुख श्याम धाने ,पवन दळवी, करण धोटे राहुल माटोडे , गुड्डू मनोहरे मुन्ना दर्शनाल ,कैलास ठाकूर, दिलीप बोरेकर, रमेश ठाकरे, पुरुषोत्तम हरडे, सुरेश चौधरी ,मुकुंद देशमुख, चेतन डोईफोडे ,सचिन वाटकर, दिलीप मोरे ,गुरु हिंगमेरे ,प्रकाश मजलवार, सुनील गिरी, प्रतिक अब्रूक, अनिल नंदनवार, वंदना गुघे, ऋषिकेश काकडे ,शिवराज चौधरी उपस्थित होते .धाने पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व कार्यकर्त्याकडून अभिनंदन होत आहे. धाने पाटील यांना शिवजयंती उत्सव आयोजनाचा प्रचंड अनुभव असल्याने यावर्षी होणारी शिवजयंती ऐतिहासिक आणि अविस्मरणीय राहील असा विश्वास शिवसैनिकांना आहे.

◆नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत◆

शिवसेना चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या बैठकीत प्रतिभा शेट्टीवार, लक्ष्मी शर्मा, वैशाली राणे ,जयश्री जटाळे, विभा गौरखेडे ,वंदना घुगे यांचे पुष्पगुच्छ देऊन धाने पाटील यांच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.

◆1986 पासून साजरा होतो उत्सव◆

धाने पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 1986 पासून शिवजयंती उत्सव अमरावती शहरात साजरा करण्यात येतो, तेव्हापासून ते शिवजयंती उत्सवाला जोडलेले आहेत. उत्सव समितीच्या कार्यकारणी ते अनेक वेळा होते. शिवजयंती उत्सव अमरावती शिवसेने करता नेहमीच ऊर्जा देणाऱ्या ठरला. अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे खरी ताकद ही शिवजयंती उत्सव मधूनच दिसली. येत्या लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिवजयंती उत्सवाला विशेष महत्त्व आहे. शिवजयंती उत्सव साजरा केल्यानंतरच शिवसेनेची खरी ताकद जनमानसात दिसून पडते त्यामुळे यंदाचा शिवजयंती उत्सव ही मोठ्या ताकतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!