spot_img

धक्कादायक…. नांदगाव पेठ जवळ धावत्या ट्रॅव्हलरवर अज्ञातांचा गोळीबार, सुदैवाने प्राणहानी नाही, चार जण जखमी, दोन दिवसांपूर्वी सुद्धा गोळीबार झाल्याची चर्चा

धक्कादायक….
नांदगाव पेठ जवळ धावत्या ट्रॅव्हलरवर अज्ञातांचा गोळीबार

◆सुदैवाने प्राणहानी नाही, चार जण जखमी
◆दोन दिवसांपूर्वी सुद्धा गोळीबार झाल्याची चर्चा

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

अमरावती वरून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हलर वाहनावर नांदगाव पेठ जवळ रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी वाहनामध्ये असलेली चार मुले किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गोळीबार करणारे आरोपी मात्र पसार झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी सुद्धा नांदगाव पेठ बस स्टॅन्ड हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे.नांदगाव पेठ पोलीसांनी याबाबत तपासाची चक्रे फिरवली असल्याची माहिती आहे.
ट्रॅव्हलर क्र. एम.एच १४,जी.डी.६९५५ रात्री प्रवासी घेऊन नागपूर कडे जातांना नांदगाव पेठ जवळ अज्ञात आरोपींनी या वाहनावर अचानक गोळीबार केला.चालकाच्या बाजूला असलेल्या खिडकीमधून तसेच प्रवाश्यांच्या दिशेने हा गोळीबार झाला.अचानक झालेल्या या प्रकाराने चालकासह प्रवासी सुद्धा भयभीत झाले.यामध्ये चार मुले जखमी असल्याची माहिती आहे.चालकाने प्रसंगावधान साधून तातडीने तेथून वाहन थेट तिवसा येथे आणले.तिवसा पोलिसांनी तातडीने जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर उपचार सुरू आहे.मात्र घटनेतील नेमके आरोपी कोण आहेत, त्यांचा गोळीबार करण्याचा उद्देश काय याबाबत माहिती मिळाली नाही.
नांदगाव पेठ पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने वाढविली.दोन दिवसांपूर्वी नांदगाव पेठ बस स्टॅन्ड वर सुद्धा गोळीबार आणि दगडफेक झाल्याची चर्चा आहे.घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणी तातडीने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!