spot_img

बसपाचे गुरुकुंज येथे एक दिवसीय प्रबोधन शिबीर, शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

बसपाचे गुरुकुंज येथे एक दिवसीय प्रबोधन शिबीर

◆शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

◆मिररवृत्त
◆तिवसा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याच्या उद्देशाने नुकतेच शासकीय विश्रामगृह गुरुकुंज मोझरी येथे एक दिवशीय प्रबोधन शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. बामसेफ चे सहसंयोजक अरविंद नागदेवते यांनी कार्यकर्त्यांना अमूल्य मार्गदर्शन करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.
या प्रबोधन शिबिराला उदघाटक म्हणून बसपा चे प्रदेश सचिव ऍड.सुनील डोंगरे हे लाभले होते.प्रमुख अतिथी म्हणून बसपा जिल्हा प्रभारी तसेच विधानसभा संयोजक रामभाऊ पाटील,जेष्ठ नेते बाळासाहेब वासनिक विधानसभा प्रभारी डॉ.एम वाय ढोणे,विधानसभा उपाध्यक्ष मंगेश वाहने, विधानसभा प्रभारी सुनील उगले,विधानसभा महासचिव आशिष थोरात विधानसभा सचिव बंडू आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत बसपा स्वतंत्र उमेदवार देण्याचा विचार करत असल्याचे देखील वरिष्ठांनी स्पष्ट केले. ईव्हीएम बॅन करून मतपत्रिकेवर निवडणूक व्हावी यादृष्टीने देखील प्रयत्न करणार असल्याचे मंथन या बैठकीत झाले.यावेळी नांदगाव पेठ जी.प. चे सेक्टर प्रभारी प्रदीप टेकाडे, गजानन मोहिते,संजय गजभिये, शेखर गजभिये, रत्नशिल रामटेके, रावसाहेब मेश्राम, दिनेश गोंडाने, प्रवीण लांजेवार, नितेश लोणारे, विलास चव्हाण, गणेश गडलिंग, नरेंद्र इंगळे, एकनाथ गाडगे,साहिल रामटेके, रवी पांडे, विलास इंगळे, परसराम गेडाम, योगेश खडसे,गजानन बागडे, विनोद मेश्राम, अश्विंदा लांजेवार,शिशुपाल तूरकाने सह महिला कमिटी,बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जयंत इंगळे यांनी केले तर आभार कृष्णा पिढेकर यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!