spot_img

खोलापूर ग्रामपंचायत ठरली ‘सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत’, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान, सरपंच व सचिवांच्या कामाचे केले कौतुक

खोलापूर ग्रामपंचायत ठरली ‘सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत’

◆पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
◆सरपंच व सचिवांच्या कामाचे केले कौतुक

◆मिररवृत्त
◆अमरावती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अमृत महाआवास अभियान अंतर्गत भातकुली पंचायत समिती मधील खोलापूर ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट ठरली. या ग्रामपंचायतने राज्य पुरस्कार अभियानात क्लस्टर आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला असून शनिवारी राज्याचे उच्च,तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरपंच व सचिवांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
खोलापूर ग्रामपंचायतच्या वतीने शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करत असून केंद्र किंवा राज्य शासनाची कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी कटिबद्ध आहे. खोलापूर ग्रामपंचायतने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महाआवास योजना ग्रामीण (घरकुल) १०० टक्के लक्षांकानुसार द्वितीय क्लस्टर मध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त केला तर घरकुलाचा लाभ देणारी सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातून दुसरा पुरस्कार सुद्धा खोलापूर ग्रामपंचायतने पटकाविला.
शनिवारी सायंस्कोअर मैदानावर सुरू असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरपंच सरला इंगळे व ग्रामविकास अधिकारी वंदना गोपाळे यांना द्वितीय क्रमांकाचे क्लस्टर व सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या कार्याचे देखील कौतुक करण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!