spot_img

लोजपा च्या रजनी वानखडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लोजपा च्या रजनी वानखडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

◆मिररवृत्त
◆अमरावती

लोक जन शक्ती पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष रजनी वानखडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष वर्षा भटकर यांच्या नेतृत्वात रजनी वानखडे यांनी प्रवेश केला असून राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्याचा यावेळी त्यांनी निर्धार केला.
नुकताच अमरावती येथे हा पक्ष प्रवेश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती शहराध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष प्रदीप राऊत यांच्या उपस्थितीत पार हा पक्षप्रवेश करण्यात आला असून रजनी वानखडे यांच्यावर शहर कार्याध्यक्षपदाची धुरा देखील सोवविण्यात आली.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी राजु चिंचमलातपुरे, सैय्यद मन्सूर ,अमित गावंडे, विनेश आडतीया, अरबाज पठाण,धनंजय तोटे, रावसाहेब वाटाणे, मनोज गावंडे, अमोल दुधाट, योगेश वानखडे, रोशन कडु, ससनकर, प्रविण भेंडे, तसेच पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हजर होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!