विविध उपक्रमांनी नितीन हटवार यांचा वाढदिवस साजरा
◆माजी खा.अनंत गुढे यांच्या हस्ते सत्कार
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उंची निर्माण करणारे माजी जि.प. सदस्य नितीन हटवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.संगमेश्वर देवस्थान येथे भोजनदान कार्यक्रमात उपस्थित झालेल्या मान्यवरांनी हटवार यांना शुभेच्छा प्रदान केल्या.माजी खा.अनंत गुढे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी भावनिक सत्कार केला.
नितीन हटवार हे रोखठोक भूमिकेमुळे प्रसिद्ध असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांची महत्वपूर्ण भूमिका असते.त्यांच्या वाढदिवसाला जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत असतात.महाशिवरात्रीच्या पर्वावर त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी अमरावती येथे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला त्यानंतर संगमेश्वर देवस्थान याठिकाणी भाविकांसाठी व मित्रपरिवारासाठी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी खा. अनंत गुढे हे उपस्थित होते त्यांनी यावेळी हटवार यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस आरोग्यमय शुभेच्छा प्रदान केल्या.यावेळी शिवसेना महानगरप्रमुख पराग गुढदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, प्रतापराव भुयार, काँग्रेसचे नेते मनोज देशमुख, बाबासाहेब वऱ्हाडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.नरेंद्र निर्मळ, शिवसेना तालुका प्रमुख कपिल देशमुख.शिवाजी चौधरी,सचिन काळे पाटील, संजू कदम, संचालक सतीश गोटे,प्रा.नरेंद्र धर्माळे ,निदान बारस्कर,श्रीकृष्ण बाळापुरे,पत्रकार मंगेश तायडे, राजेंद्र तुळे, मंगेश गाडगे,मनोज मोरे, संजू ढोरे, संतोष मालधुरे, भालचंद्र मावळे, लोखंडे सर, चेतन चकूले,संदिप अकोलकर,बालाभैय्या बैस,संतोष शेंदरकर,किशोर, साखरवाडे, आनंद लोहोटे, अभिजीत बानासुरे, देवेंद्र सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवर व हटवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.