spot_img

पर्यवेक्षक रमेश वानखडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्य सत्कार

पर्यवेक्षक रमेश वानखडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्य सत्कार

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून व वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून नव्या पिढीला आदर्श बनविणारे येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश वानखडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्य त्यांचा नुकताच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
याप्रसंगी निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य देवेंद्र ठाकरे, हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षिका स्वाती नारखेडे, अंबादास बनसोडे,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक रमेश वानखडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
समर्पित आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले रमेश वानखडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्य प्राचार्य देवेंद्र ठाकरे व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. रमेश वानखडे यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. कोळी यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!