ब्रेकिंगन्यूज- महाराष्ट्रात होणार मतपत्रिकेवर निवडणूक ?
◆धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिले निवडणूक आयोगाला पत्र
◆मिररवृत्त
◆धाराशिव
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. अशात आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील. यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. या पत्राच्या माध्यमातून ओम्बासे यांनी आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. यावर आता निवडणूक आयोग काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाने उमेदवार उभे केल्यास ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावा लागणार आहेत. त्यामुळे मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल. तसेच अधिकारी, वाहन, अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी देखील येणार आहेत. उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार, घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी पत्रातून निवडणूक आयोगाला सांगितले आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले असुन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहले आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून देत मार्गदर्शन मागविले आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय मार्गदर्शन करते याकडे लक्ष लागले आहे.