spot_img

अमरावतीत लोकसभेसाठी ‘कमळ’वरच उमेदवार हवा, भाजप जिल्हा महामंत्री सत्यजित राठोड यांची मागणी

अमरावतीत लोकसभेसाठी ‘कमळ’वरच उमेदवार हवा

◆भाजप जिल्हा महामंत्री सत्यजित राठोड यांची मागणी

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

लोकसभा निवडणुक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत मात्र अमरावतीत अद्यापही महायुतीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नसून या मतदारसंघातून लढणारा उमेदवार हा कमळ या चिन्हावरच लढावा अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री सत्यजित राठोड यांनी वरिष्ठांकडे केलेली आहे.
अमरावती हा भाजपसाठी पोषक मतदार संघ आहे. भाजप जो कुणी उमेदवार रिंगणात उतरवेल तो निश्चित निवडून येईल यात शंका नाही.जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे आणि कार्यकर्ते हा कमळ वरील उमेदवार निवडून आणू शकतो असा दृढ विश्वास कार्यकर्त्यांना आहे. अमरावतीत लोकसभा उमेदवाराचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून भाजपने आपल्या लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करून विजयश्री कार्यकर्त्यांच्या भरवशावर सोडून द्यावा अशी कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका आहे.
कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा कमळ वर लढणारा उमेदवार असल्यास जिल्ह्यात पक्षाची आणखी ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे भाजपने आपल्या संभाव्य उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी जेणेकरून ग्रामीण भागातील कार्यकर्ता तन मन धनाने त्या उमेदवाराचे प्रचारकार्य करेल अशी मागणी सत्यजित राठोड यांनी केली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!