spot_img

विदर्भातील अवकाळी पावसाने तसेच गारपीट मुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या-सचिन ढगे

विदर्भातील अवकाळी पावसाने तसेच गारपीट मुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या-सचिन ढगे

◆मिररवृत्त
◆अमरावती

विदर्भात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तसेच गारपिटी मुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपयांची सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी मल्हार फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन ढगे यांनी शासनाकडे केली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस थोड्या फार घरात आला आहे परंतु मोठ्या प्रमाणातील कापूस शेतात पडून असताना वादळी, वारा आणि अवकाळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे,शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातच त्याच्या या पांढऱ्या सोन्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नाही,कापूस तर सोडाच शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसामुळे सोयाबीन,हरभरा,तसेच काही ठिकाणी गव्हाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे विदर्भातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 30 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी.
त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक ताण कमी होईल,तसेच पुढील पिकासाठी त्याला शेततयार करण्यासाठी हे पैसे कामात पडेल आणि शेतकऱ्याला थोडी फार जरी शासनाकडून आर्थिक मदत मिळाली तरी येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्या सारखे पाऊल उचलणार नाही,शासनाने विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये जरी आर्थिक मदत केली तरी शेतकरी या आर्थिक तंगीच्या महागाईच्या काळात सुध्दा आपला उदर निर्वाह करू शकतो.तो आत्महत्या सारखे पाऊल उचलणार नाही,म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा, अन्न दात्याचा विचार करून त्याच्या मालाला योग्य भाव द्यावा, व त्याला अवकाळी पावसा मुळे,तसेच गारपिटी मुळे नुकसान झालेल्या ,सर्वच शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता हेक्टरी 30 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात यावी,आणि भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी मागणी मल्हार फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन ढगे यांनी शासनाकडे केली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!