spot_img

स्व.दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

स्व.दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जनजागृती करण्याच्या हेतूने प्रा. राजेश ब्राह्मणे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.सदर व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विजय दरणे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर रासेयो महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनिता बाळापुरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.गोविंद तिरमनवार यांनी सदर व्याख्यानाच्या आयोजनामाची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. प्रमुख वक्ते प्रा.राजेश ब्राह्मणे यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या अधिकारासंदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे आणि निवडणुकांच्या वेळी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही सुदृढ करावी. मतदानाचा मिळालेला अधिकार हा लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वपूर्ण अधिकार असल्याने सर्वांनी मिळालेला अधिकाराचा उपयोग न चुकता करावा असे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विजय दरणे यांनी अध्यक्षीय भाषणातून सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दिव्या सुरजुसे आणि आभार प्रदर्शन सिद्धी बोंद्रे यांनी केले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी. आर. जाधव, डॉ. श्रीकांत माहुलकर ,डॉ.विकास अडलोक, डॉ.सुभाष पवार ,डॉ. पंकज मोरे, ज्ञानेश्वर बारस्कर, रेखा पुसतकर, विनायक पावडे, दिलीप पारवे, अनिल शेवतकर, राहुल पांडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!